इंदिरा गांधी यांचे अंकशास्त्रीय विश्लेषण

महावीर सांगलीकर

Senior Numerologist
Phone Number 8149703595

भारताच्या तिसऱ्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे व्यक्तिमत्व अतिशय वादळी होते. त्यांचे राजकीय जीवन प्रचंड यश आणि प्रचंड विरोध यांनी भरलेले होते. त्यांचे कौटुंबिक जीवन अयशस्वी होते.

या लेखात मी इंदिरा गांधी यांचे अंकशास्त्रानुसार विश्लेषण केले आहे. हा लेख अंकशास्त्राच्या अभ्यासकांना मार्गदर्शक आणि उपयुक्त ठरेल.

इंदिरा गांधी यांची जन्मतारीख 19 नोव्हेंबर 1917 ही होती. त्यानुसार त्यांचा जन्मांक (Birth Number) 19/10/1, ऍटिट्यूड नंबर 12/3 आणि भाग्यांक (Life Path Number) 30/3 होता. त्यांच्या Indira Gandhi या लोकप्रिय नावानुसार त्यांचा नामांक (Expression Number) 71/8 होता.

जन्मांक: 19/10/1 (19=1+9=10=1+0=1)
ऍटिट्यूड नंबर: 19.11=12/3 (1+9+1+1=12=1+2=3)
भाग्यांक: 30/3 (19.11.1917 = (1+9) + (1+1) + (1+9+1+7) = (10+2+18 =30=3+0=3)
नामांक: 71/8
I N D I R A G A N D H I
9 5 4 9 9 1 7 1 5 4 8 9
(37) + (34) =71=7+1=8

INDIRA या नावाची अंकातली किंमत 37=3+7=10=1 येते, जो त्यांचा जन्मांकही आहे.

इंदिरा गांधी यांच्या जीवनात 9 हा अंक अनेकदा आलेला दिसतो. मुळात त्यांच्या नावात 9 हा अंक 4 वेळा आलेला आहे. तसेच त्यांचा वर्षांक (Birth Year) ही 9 आहे. (1917 =1+9+1+7 =18=1+8=9)

वरील अंकांचे गुणदोष पहा:
अंक 1: नेतृत्वगुण, लोकसंग्रह, सत्ता, हुकुमशाही प्रवृत्ती
अंक 19: नेतृत्व गुण, लढाऊ वृत्ती. अंकशास्त्रात 19 हा नंबर Karmic Debts Number म्हणून ओळखला जातो. चार्टमध्ये हा नंबर असल्यास ती व्यक्ती सत्तेचा दुरुपयोग करण्याची शक्यता असते, व पुढे तिला त्याचे परिणाम भोगावे लागतात.
अंक 3: उत्साह, आकर्षक व्यक्तिमत्व, नेतृत्वगुण, भावनाशीलता
अंक 8: सत्ता, संघर्ष, अडथळे, हुकुमशाही प्रवृत्ती, कौटुंबिक कलह
अंक 9: लढाऊ वृत्ती, संघर्ष, आध्यात्मिकता.

आता आपण इंदिरा गांधी यांच्या जीवनातील महत्वाच्या घटना आणि तिथे आलेले अंक पाहू:
1917: जन्मसाल, पूर्ण बेरीज 18=1+8=9
26.3.1942: फिरोझ गांधी यांच्याशी लग्न. 26=2+6=8, पूर्ण तारखेतील अंकांचीबेरीज 27=9.
20.08.1944 राजीव गांधी यांचा जन्म. या तारखेतील अंकांची बेरीज 28=2+8=10=1+0=1. या दिवसाचा ऍटिट्यूड नंबर 1 (20.08=2+0+0+8=10=1+0=1)
14.12.1946 संजय गांधी यांचा जन्म. या तारखेतील अंकांची बेरीज 28=2+8=10=1+0=1 या दिवसाचा ऍटिट्यूड नंबर 8 (14.12=1+4+1+2=8)
09.06.1964 केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री म्हणून निवड. या तारखेतील अंकांची बेरीज 35=8
1971: लोकसभा निवडणुकीत प्रचंड यश, भारत पाकिस्तान युद्ध, भारताचा प्रचंड विजय. 1971 मधील अंकांची बेरीज 18=9 (1971 या अंकात इंदिरा गांधी यांचे जन्मसाल असलेल्या 1917 या सालातील सगळे अंक आलेले आहेत ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे).
16.12.1971 युद्धामध्ये पाकिस्तान भारताला शरण, स्वतंत्र बांगला देशची निर्मिती : या तारखेतील अंकाची पूर्ण बेरीज 28=2+8=10 =1+0=1. या दिवसाचा ऍटिट्यूड नंबर 1 (16.12=1+6+1+2=10=1+0=1), वर्षांक 9.
12.06.1975 अलाहाबाद हायकोर्टाकडून इंदिरा गांधी यांची निवडणूक रद्द (12=1+2=3), या दिवसाचा ऍटिट्यूड नंबर 9 (12.06=1+2+0+6=9)
25.6.1975: देशात आणीबाणी जाहीर: पूर्ण बेरीज 35=3+5=8
21.03.1977 आणीबाणी उठवली. पूर्ण बेरीज 30=3+0=3
1980: लोकसभेच्या निवडणुकीत प्रचंड यश. 1980 पूर्ण बेरीज 18=9
(1980 या अंकात त्यांचा जन्मांक 1, नामांक 8 आणि वर्षांक 9 हे तीनही अंक आलेले आहेत!)
1980: मुलगा संजय गांधी यांचा अपघाती मृत्यू बेरीज 18=9
मृत्यू 31.10.1984 पूर्ण बेरीज 27= 9

मतदारसंघ RAEBARELI (9+1+5+2+1+9+5+3+9 =44=4+4=8)
निवासाचे शहर : NEW DELHI (5+5+5+4+5+3+8+9 =44=4+4=8)
निवासस्थान पत्ता: 1 Safdarjung Road (1)
भारताच्या 3 ऱ्या पंतप्रधान

उल्लेख करण्यासारखी आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे इंदिरा गांधी पहिल्यांदा पंतप्रधान झाल्या ते साल (1966), अलाहाबाद हायकोर्टाकडून निवडणूक रद्द झाली ते साल (1975), इंदिरा गांधी यांनी आणीबाणी जाहीर केली ते साल (1975) आणि त्यांचा मृत्यू झाला ते साल (1984) यात एक समान धागा आहे, तो म्हणजे या तीनही सालातील अंकांची बेरीज 22 येते.

(या लेखात मी इंदिरा गांधी यांच्या जीवनातील फक्त महत्वाच्या घटनांचा विचार केला आहे).

हेही वाचा

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

न्यूमरॉलॉजी | नंबर कम्पॅटिबिलिटी । अंकांची सुसंगतता व विसंगतता

बाळाचे नाव: नावरस नाव म्हणजे काय?

26चा आकडा आणि वैवाहिक जीवन

अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा!

अंकशास्त्र मराठी टेलिग्राम ग्रुप

यावर आपले मत नोंदवा