अंकशास्त्र: जन्मांक 4 जन्मतारीख 4, 13, 22, 31

महावीर सांगलीकर

Numerologist, Graphologist & Face Reader
Cell Phone Number 8149703595

ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 किंवा 31 तारखेस झाला आहे, त्यांचा जन्मांक 4 असतो.

यांचे मुख्य वैशिष्ठय म्हणजे या व्यक्ति इतरांच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने विचार करतात, आणि त्या मांडत असलेले विचार इतरांच्यापेक्षा खूपच वेगळे असतात. म्हणजे तुम्ही एखाद्या नाण्याच्या छाप्याबद्दल बोलत असाल तर या व्यक्ति काट्याबद्दल बोलतील, आणि नाण्याला केवळ दोनच बाजू नसून तीन बाजू असतात हेही दाखवून देतील. वरवर विचार करण्याऐवजी हे लोक खोलवर विचार करत असल्याने इतरांना असे वाटते की ते मुद्दाम आपले म्हणणे खोडून काढत आहेत. त्यात या व्यक्तींचा स्वभाव कांहीसा आक्रमक आणि स्पष्टवक्तेपणाचा असल्याने बऱ्याचदा समोरच्याचे मन दुखावले जाते. यांचा स्पष्टवक्तेपणा कांहीवेळा फटकळपणा बनतो.

आपल्या कामाच्या बाबतीत या व्यक्ति ‘परफेक्शनिस्ट’ असतात. तर्कनिष्ठ बुद्धी आणि वक्तशीरपणा ही यांची आणखी कांही वैशिष्ठ्ये.

या व्यक्ति ज्या क्षेत्रात काम करतात, तेथे त्यांच्याकडून फार मोठे, अविश्वसनीय काम होवू शकते. या व्यक्ति या ना त्या कारणाने प्रसिद्धीच्या झोतात येतात.

यांच्या हातात सत्ता आली किंवा यांना अधिकार मिळाले तर ते सिस्टीममध्ये मोठे बदल घडवतात, चुकीची सिस्टीम मोडीत काढतात.

या व्यक्ति पैशाला फारसे महत्व देत नाहीत. पैसा ही गोष्ट त्यांच्यासाठी दुय्यम असते. तसेच या व्यक्ति ‘अतिहुशार’ या सदरात मोडत असले तरी झटपट पैसे मिळवण्याचे ते टाळतात, आणि पैसे कष्टाने, विशेषत: त्यांच्या बौद्धिक कष्टाने मिळवत असतात.

शैक्षणिक आणि टेक्निकल क्षेत्रात जन्मांक 4 असणाऱ्यांची संख्या जास्त दिसते.

कुणाच्या बॉसिंग खाली काम करणे यांना शक्य होत नसते. प्रसंगी आपल्या बॉसला किंवा वरिष्ठांना जाब विचारण्यास ही हे लोक कमी करत नाहीत. त्यांच्या या विशिष्ट स्वभावामुळे त्यांनी नोकरी करण्यापेक्षा स्वतंत्र व्यवसाय करणे चांगले. नोकरी केली तरी ती अशी असावी की जिथे त्यांच्यावर कुणाचे बॉसिंग होणार नाही.

या व्यक्तिंना भरपूर मित्र आणि भरपूर शत्रूही असतात. ज्यांचा जन्मांक 2, 4, 6 किंवा 8 आहे त्यांचे आणि या व्यक्तिंचे चांगलेच मेतकूट जमते. 8 जन्मांक असणाऱ्या व्यक्तिंशी यांचे चांगले पटते आणि भांडणेही होतात.

यांच्यापैकी ज्यांची जन्मतारीख 13 आहे त्यांच्यामध्ये गूढ विद्यांविषयी आकर्षण निर्माण होऊ शकते. या व्यक्ती आपल्या वागण्या-बोलण्यातून इतरांना दुखावणाऱ्या, त्रासदायक ठरू शकतात. (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 13 तारखेस झाला असेल आणि तुम्हाला कोणी 13 हा अंक अशुभ किंवा अनलकी आहे असं सांगितलं असेल तर माझा Is 13 an Unlucky Number? हा इंग्रजी लेख अवश्य वाचा). तर 22 तारखेला जन्मलेल्या व्यक्ती मोठे लोकोपयोगी, शैक्षणिक किंवा समाजसुधारणेची कामे करून दाखवू शकतात.

लकी नंबर्स:
4 व एक अंकी बेरीज 4 येणारे अंक ( 13, 22, 31, 40 ….. 103 … 202 वगैरे)

सुसंगत नंबर्स (Compatible Numbers)
2, 4, 6, 8

विसंगत नंबर्स (Incompatible Numbers)
1, 3, 5, 9

करीअर:
या जन्मांकाच्या व्यक्तींना योग्य असणाऱ्या करिअर्सची माहिती पुढील लिंकवर वाचावी:
अंकशास्त्र: जॉब करावा की व्यवसाय?

जन्मांक 4 असणाऱ्या प्रसिद्ध प्रसिद्ध व्यक्ति
जॉर्ज वाशिंग्टन, राजाराम मोहन रॉय, दादाभाई नौरोजी, मायकेल फॅराडे, सर ऑर्थर कॉनन डॉयल,सरदार वल्लभ भाई पटेल, कर्मवीर भाऊराव पाटील, बराक ओबामा, वसंतदादा पाटील, डी. वाय. पाटील, अजित दादा पवार, देवेंद्र फडणवीस, अमित शहा.

कर्मवीर भाऊराव पाटील

वरील यादीवर नजर टाकली तर त्यांच्यात ‘खमके’ राजकारणी, बंडखोर, समाज सुधारक आणि जिनिअस व्यक्ति झालेल्या दिसतात.

(सूचना: प्रत्येक व्यक्तीवर जन्मांकाबरोबरच इतर कोअर नंबर्सचा देखील प्रभाव असतो. त्यानुसार जन्मांकाचा प्रभाव वाढू शकतो अथवा कमी होऊ शकतो. कोअर नंबर्स विषयी अधिक माहिती अंकशास्त्र: कोअर नंबर्स येथे वाचावी).

घरबसल्या न्यूमरॉलॉजी (अंकशास्त्र) शिका

अंकशास्त्र मराठी टेलिग्राम ग्रुप

हेही वाचा

अंकशास्त्र: जन्मांक 1: जन्मतारीख 1,10,19,28

अंकशास्त्र: जन्मांक 2: जन्मतारीख 2, 11, 20, 29

अंकशास्त्र: जन्मांक 3: जन्मतारीख 3, 12, 21, 30

अंकशास्त्र: जन्मांक 5 जन्मतारीख 5, 14, 23

अंकशास्त्र: जन्मांक 6 जन्मतारीख 6, 15, 24

अंकशास्त्र: जन्मांक 7 जन्मतारीख 7, 16, 25

अंकशास्त्र: जन्मांक 8 जन्मतारीख 8, 17, 26

अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा!

अंकशास्त्रानुसार बाळाचे योग्य नाव

English Articles on Numerology

Join my Numerology & Graphology Channel at Telegram:
https://t.me/mahaveersanglikar

Join my Business, Money & Wealth Channel at Telegram:
https://t.me/businessmoneywealth

तुम्हाला गुंगवून ठेवणाऱ्या आगळ्या वेगळ्या मराठी लघुकथा वाचा

यावर आपले मत नोंदवा