अंकशास्त्र: जन्मांक 8 जन्मतारीख 8, 17, 26

महावीर सांगलीकर

Numerologist, Graphologist & Face Reader
Cell Phone Number 8149703595

कोणत्याही महिन्याच्या 8, 17 किंवा 26 या तारखेस जन्मलेल्या व्यक्तीचा जन्मांक 8 असतो. 8 हा अंक सत्ता, धन आणि संपत्ती यांच्याशी संबंधीत आहे. या अंकात प्रचंड शक्ती आहे.

8 हा अंक कांही लोकांनी अतिशय बदनाम केला आहे. ज्योतिषांनी या अंकाचा संबंध शनि या ग्रहांशी जोडला आहे आणि शनीचे सगळे दुर्गुण या अंकाच्या माथी थोपले आहेत. चालडियन अंकशास्त्राची प्रॅक्टिस करणाऱ्या न्यूमरॉलॉजिस्टांनीदेखील (जे जास्त करून ज्योतिषी असतात) या अंकाचा संबंध शनिशी जोडून हा अंक बदनाम केला आहे.

पण प्रत्यक्षात कोणत्याही अंकाचा कोणत्याही ग्रहाशी संबंध नसतो, आणि कोणत्याही अंकावर कोणत्याही ग्रहाचा प्रभाव नसतो.

तुमचा जन्मांक 8 असेल आणि कोणी तुम्हाला सांगत असेल की 8 हा अंक वाईट आहे, तर अजिबात घाबरू नका. नेहमी लक्षात ठेवा की कोणताही अंक चांगला किंवा वाईट नसतो, आणि प्रत्येक अंकात कांही गुण तर कांही दोष असतात.

तुम्ही तुमच्या क्षमता ओळखा, त्यानुसार स्वतःचा विकास करा. एक दिवस असा येईल की 8 अंकाला वाईट ठरवणारे लोक मागे पडतील आणि तुम्ही पुढे जाल!

ज्यांचा जन्मांक 8 आहे अशा व्यक्तींकडे व्यवस्थापन, ऍडमिनिस्ट्रेशन, फंड मॅनेजमेंट या गोष्टींची उपजत क्षमता असते. त्याचबरोबर या व्यक्तींकडे धन कमावण्याची आणि संपत्ती निर्माण करण्याची मोठी क्षमता असते. याशिवाय त्यांच्याकडे आपल्या क्षेत्रात सत्ता मिळवण्याची ही क्षमता असते. त्यांच्याकडे या क्षमता उघड किंवा सुप्त अवस्थेत असतात.

या व्यक्ती सहसा रॉयल राहणीमान असणाऱ्या असतात.

यांच्यामध्ये करुणाभाव असतो, आणि एखाद्या मानवतावादी कामात आपले आयुष्य झोकून द्यायची क्षमताही असते. (विशेषतः जन्मतारीख 26 असेल तर. उदा. मदर तेरेसा, बाबा आमटे, प्रकाश आमटे वगैरे).

ज्या व्यक्तिंच्याबद्दल यांना आपुलकी असते, त्यांना या व्यक्ति बोलून दाखवत नाहीत, तर त्यांच्यासाठी कांहीतरी करून दाखवतात.

या व्यक्ति सावधचित्त असतात, समोरच्या व्यक्तीला जज करण्यात पटाईत असतात आणि समोरील व्यक्ति वाईट भावनेची असेल तर यांना ते लगेच कळते. हे गुण जन्मांक 8 असणा-या स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतात.

हा जन्मांक असणा-या लोकांना येणाऱ्या समस्या या बहुतेक वेळा त्यांनी स्वत: ओढावून घेतलेल्या असतात. सतत तणावाखाली रहाणे, छोटाश्या कारणाने नाराज होणे, झटपट निर्णय न घेणे, कामे पुढे ढकलणे, एकलकोंडेपणा, अतिरिक्त ठामपणा, इतरांशी फारसा संवाद न साधणे, आपल्या भावना व्यक्त न करता येणे हे 8 हा जन्मांक असणाऱ्यांचे कांही ठळक दोष.

यांचे लहानपण बहुधा खडतर गेलेले असते आणि यांच्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट उशीरा घडत असते.

त्यांना घरून फारसे कांही मिळत नाही आणि ते जे कांही करतात ते स्वत:च्या हिम्मतीवर करतात. आयुष्याच्या उत्तरार्धात या व्यक्ति खूप यशस्वी झाल्याचे दिसते.

जन्मांक 4, 6 किंवा 2 असणा-यांशी यांची चांगली नाळ जुळते.

हा अंक परस्परविरोधी गुणदोष असणारा आहे. म्हणजे हा जन्मांक असणाऱ्या व्यक्तीमध्ये अतिशय यशस्वी होण्याची अथवा अतिशय अयशस्वी होण्याची क्षमता असते. त्याचप्रमाणे ते प्रत्यक्ष जीवनात ते एकतर हिरो नाहीतर व्हिलन होतात.

8, 17, 26 या तारखेस जन्मलेल्या लोकांचे गुणदोष साधारणपणे वरीलप्रमाणे असतात, आणि 8 पेक्षा 17 मध्ये आणि 17 पेक्षा 26 मध्ये हे गुणदोष जास्त प्रमाणात आलेले दिसतात.

लकी नंबर्स
8 व एक अंकी बेरीज 8 येणारे अंक (पण जन्मांक 8 असणाऱ्या व्यक्तीने त्यांच्यासाठी 8 हा लकी नंबर असला तरी तो टाळावा, कारण या अंकामुळे त्या व्यक्तीचे दोष वाढू शकतात. त्या ऐवजी यांनी आपल्या कोअर नंबर्समध्ये 6, 4, 2 या पैकी एखादा नंबर असेल तर तो आपला लकी नंबर म्हणून वापरावा).

सुसंगत नंबर्स (Compatible Numbers)
2, 4, 6, 8

विसंगत नंबर्स (Incompatible Numbers)
3, 5, 7, 9

करीअर:
या जन्मांकाच्या व्यक्तींना योग्य असणाऱ्या करिअर्सची माहिती पुढील लिंकवर वाचावी:
अंकशास्त्र: जॉब करावा की व्यवसाय?

जन्मांक 8 असणा-या कांही प्रसिद्ध व्यक्ति: मदर तेरेसा, बाबा आमटे, प्रकाश आमटे, मन मोहन सिंग, नरेंद्र मोदी, स्टीफन हॉकिंग, मनेका गांधी, एम. जी. रामचंद्रन, हैदर अली.

घरबसल्या न्यूमरॉलॉजी (अंकशास्त्र) शिका

प्रकाश आमटे: जन्मांक 8

(सूचना: प्रत्येक व्यक्तीवर जन्मांकाबरोबरच इतर कोअर नंबर्सचा देखील प्रभाव असतो, त्यामुळे या अंकाचे गुणदोष कमी-जास्त होऊ शकतात).

अंकशास्त्र मराठी टेलिग्राम ग्रुप

हेही वाचा

अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा!

अंकशास्त्रानुसार बाळाचे योग्य नाव

English Articles on Numerology

अंकशास्त्र: जन्मांक 1: जन्मतारीख 1,10,19,28

अंकशास्त्र: जन्मांक 2: जन्मतारीख 2, 11, 20, 29

अंकशास्त्र: जन्मांक 3: जन्मतारीख 3, 12, 21, 30

अंकशास्त्र: जन्मांक 4 जन्मतारीख 4, 13, 22, 31

अंकशास्त्र: जन्मांक 5 जन्मतारीख 5, 14, 23

अंकशास्त्र: जन्मांक 6 जन्मतारीख 6, 15, 24

अंकशास्त्र: जन्मांक 7 जन्मतारीख 7, 16, 25

3 thoughts on “अंकशास्त्र: जन्मांक 8 जन्मतारीख 8, 17, 26

यावर आपले मत नोंदवा