अंकशास्त्र: जन्मांक 5 जन्मतारीख 5, 14, 23

महावीर सांगलीकर

Numerologist, Graphologist & Face Reader
Cell Phone Number 8149703595

● कोणत्याही महिन्याच्या 5, 14 किंवा 23 तारखेस जन्मलेल्या व्यक्तींचा जन्मांक 5 असतो.
● या लोकांची वैशिष्ठ्ये म्हणजे हे लोक जिनिअस, मल्टिटॅलेंटेड, खोलवर विचार करणारे, उत्तम वक्ते, झटपट विचार करणारे आणि झटपट निर्णय घेणारे, इतरांना प्रेरणा देणारे आणि मदत करणारे असतात. त्यांच्याकडे उत्तम संघटन कौशल्य असते. या व्यक्ति सतत प्रसिद्धीच्या झोतात असतात.
● त्यांना लोकांना कसे हाताळावे आणि त्यांच्याशी कसा व्यवहार यांची चांगली जाण असते.
● हे लोक कला आणि सौन्दर्याची आवड असणारे, रोमांटिक आणि प्रेमळ असतात पण प्रसंगी हे लोक कठोर बनू शकतात. त्यांच्यापैकी बहुतेकांच्याकडे उत्तम लेखन कौशल्यही असते. वक्तृत्व आणि लेखन या दोन्ही गोष्टी असल्यामुळे त्याचा त्यांना मोठा फायदा होतो.
● हा जन्मांक असणा-या व्यक्ति सहजपणे नवे मित्र मिळवतात. समाजाच्या सर्व थरात त्यांना भरपूर मित्र असतात. इतरांशी संवाद साधणे आणि आपला लोकसंग्रह वाढवणे त्यांना चांगले जमते.
● हे स्वातंत्र्यप्रिय असतात, कुणाच्या बॉसिंग खाली काम करू शकत नाहीत. त्यामुळे हे सहसा नोकरीऐवजी स्वत:च्या व्यवसायाला प्राधान्य देतात. यांचा भरपूर प्रवास होतो. संशोधन, मिडिया, साहित्य, संगीत, अभिनय, व्यापार उद्योग यात हे लोक जास्त दिसतात.
● या व्यक्ति उत्कृष संयोजक असतात आणि कोणत्याही मोठ्या कामाचे संयोजन व्यवस्थित आणि यशस्वीरीत्या करतात.
● या व्यक्तिंना कामामध्ये ढिसाळपणा आवडत नाही.
● या व्यक्ति पारंपारिक मार्गापेक्षा वेगळ्या मार्गाने, जोखीम घेवून आपल्या बुद्धीच्या जोरावर भरपूर पैसे कमावतात.
● या व्यक्ति आशावादी, उत्साही, आनंदी आणि इतरांना प्रेरणादायक असतात.
● हे समाजात मिसळणारे लोक असतात. सामाजिक क्षेत्रात या व्यक्ती लोकप्रिय होतात. त्यांच्या मैत्रीपूर्ण स्वभावामुळे त्यांना सगळीकडे आदर मिळतो.
● या व्यक्तिंना सहसा एकटे रहायला आवडत नाही. त्या नेहमी कुणा ना कुणाबरोबर असतात बोलत असतात. जेंव्हा महत्वाचे काम असते तेंव्हाच या व्यक्ति इतरांपासून दूर राहतात.
● हे लोक एखाद्या ध्येयाने पछाडलेले असतात. त्याचप्रमाणे यांच्यातील कांही लोक समाजसुधारणा, सामाजिक चळवळी या क्षेत्रात काम करताना दिसतात. कांही लोक द्वेषाचे राजकारण करतात.
● यांचा बहुधा प्रेम विवाह होत असतो. यांच्यातील अनेक लोकांची लव्ह अफेअर्स होण्याची शक्यता असते, हे लोक एकाच जोडीदाराशी प्रामाणिक राहण्याची शक्यता नसते.
● मल्टिटॅलेन्टेड असल्याने, विविध विषयांमध्ये रस असल्याने हे लोक एकावेळी अनेक प्रकारच्या गोष्टी करत असल्याचे दिसते. ‘चेंज’ हा त्यांचा स्थायीभाव असल्याने एखाद्या गोष्टीवर जास्त काळ टिकून राहणे त्यांना जमत नाही.
● कोणत्याही एका ठिकाणी, एका व्यवसायात स्थिर रहाण्याचा त्यांचा स्वभाव नसतो. निरनिराळ्या गोष्टी अजमावून पहाणे हा त्यांचा स्वभावधर्म असतो.
● स्वतंत्र जीवन, स्वातंत्र्य हा त्यांचा स्थायीभाव असतो. त्यामुळे कुणाच्या हाताखाली काम करणे त्यांना शक्य नसते. त्यामुळे या व्यक्तींनी नोकरीपेक्षा व्यवसाय करणे सोयीस्कर ठरते.
● यांच्यातील कांही लोक ‘ओव्हरस्मार्ट’ असतात. यांच्याकडून आर्थिक गुन्हे, हेराफेरी वगैरे गोष्टी होऊ शकतात. (विशेषत: 14 तारखेच्या बाबतीत).

जन्मांक 5 असणा-या व्यक्तिंकडे वरील गुण असले तरी त्यांच्याकडे अनेक दोषही असतात.
● त्यांच्या स्वभाव मूडी असतो व ते बऱ्याचदा बेचैन किंवा उत्तेजित होतात.
● या लोकांना छोट्या छोट्या गोष्टींवरून राग येण्याची शक्यता असते.
● यांच्या मनासारखे न झाल्यास त्यांना मोठे डिप्रेशन येऊ शकते व त्यातून ते व्यसनांच्या आहारी जाऊ शकतात. विशेषकरून ज्यांचा जन्म 14 तारखेस झालेला असतो ते लोक व्यसनांच्या आहारी जाण्याची शक्यता असते. जन्मांक असणारे माझे कित्येक परिचित असे आहेत की जे चेन स्मोकर आहेत, किंवा ते दारू जास्त प्रमाणात पितात.
● या व्यक्ति अपयश आले तर निराश होऊन व्यसनाधीन होऊ शकतात. अशा परिस्थितीत या व्यक्ती अविचारी बनून चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता असते.
● आपल्या कामाच्या बाबतीत यांच्यात बेशिस्तपणा येऊ शकतो.
● यांची अनेक अफेअर्स होऊ शकतात, तसेच यांच्या रिलेशनशिप्स तुटू शकतात.
● रुटीन कामांचा यांना कंटाळा येऊ शकतो, त्यामुळे कामे अर्धवट सोडून देण्याची प्रवृत्ती यांच्यात येऊ शकते.
● यांच्यात बंडखोरपणा आणि विद्रोही वृत्ती येऊ शकते.
● यांना झटपट पैसे कमावण्याचा मोह होऊ शकतो.
● यांच्या फटकळ प्रतिक्रिया देण्याचा वृत्तीमुळे लोकांची मने दुखावली जाऊ शकतात.
तुमच्यातही वरील गुणदोष उपजतपणे असू शकतात. दोषांना आळा घालून गुणांचा विकास केल्यास तुम्ही उंच भरारी घेऊ शकता. तुम्ही आपले टॅलेंट वाया जाईल असे उद्योग न करणे तुमच्या हिताचे ठरेल. तसेच तुम्ही ‘Think Big, Think Global’ या धोरणाचा अवलंब केला पाहिजे.

लकी नंबर्स:
5 व एक अंकी बेरीज 5 येणारे नंबर्स (14, 23, 32, 41 वगैरे)

सुसंगत नंबर्स (Compatible Numbers)
1, 5, 7
विसंगत नंबर्स (Incompatible Numbers)
2, 4, 6, 8

लकी तारखा:
5, 14, 23

करीअर:
या जन्मांकाच्या व्यक्तींना योग्य असणाऱ्या करिअर्सची माहिती पुढील लिंकवर वाचावी:
अंकशास्त्र: जॉब करावा की व्यवसाय?

(सूचना: प्रत्येक व्यक्तीवर जन्मांकाबरोबरच इतर कोअर नंबर्सचा देखील प्रभाव असतो. त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीत त्या अंकाचे गुण डेव्हलोप होणार की दोष हे त्याच्या इतर अंकांवर अवलंबून असते).

घरबसल्या न्यूमरॉलॉजी (अंकशास्त्र) शिका

अंकशास्त्र मराठी टेलिग्राम ग्रुप

हेही वाचा

अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा!

अंकशास्त्र: जन्मांक 1: जन्मतारीख 1,10,19,28

अंकशास्त्र: जन्मांक 2: जन्मतारीख 2, 11, 20, 29

अंकशास्त्र: जन्मांक 3: जन्मतारीख 3, 12, 21, 30

अंकशास्त्र: जन्मांक 4 जन्मतारीख 4, 13, 22, 31

अंकशास्त्र: जन्मांक 6 जन्मतारीख 6, 15, 24

अंकशास्त्र: जन्मांक 7 जन्मतारीख 7, 16, 25

अंकशास्त्र: जन्मांक 8 जन्मतारीख 8, 17, 26

अंकशास्त्र: जन्मांक 9 जन्मतारीख 9, 18, 27

अंकशास्त्रानुसार बाळाचे योग्य नाव

English Articles on Numerology

2 thoughts on “अंकशास्त्र: जन्मांक 5 जन्मतारीख 5, 14, 23

यावर आपले मत नोंदवा