अंकशास्त्र: जन्मांक 7 जन्मतारीख 7, 16, 25

महावीर सांगलीकर

Numerologist, Graphologist & Face Reader
Cell Phone Number 8149703595

Read about number 7 in English at:
Numerology Number 7

● तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16 किंवा 25 तारखेस झाला असेल तर तुमचा जन्मांक (Birth Number) 7 आहे.

● जन्मांक 7 असणा-या व्यक्तिंचे वैशिष्ठ्य म्हणजे या व्यक्ति अंतर्मुख असतात. त्या वरून शांत दिसतात, पण मनातून बेचैन असतात. या व्यक्ति सतत कांहीतरी विचार करत असलेल्या दिसतात. त्यांना एकांताची आवड असते, आणि अगदी कामाच्या ठिकाणीही एकांताचा अनुभव घेण्याचे कसब त्यांच्याकडे असते.

● यांची आकलन शक्ती आणि समज चांगली असते, त्यामुळे कोणताही नवा विषय त्यांना चटकन आणि सहज समजतो.

● आपले काम ही त्यांच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट असते.

● या व्यक्ती निरीक्षण आणि विश्लेषण करण्यात पटाईत असतात. यांच्या नजरेतून एखादी गोष्ट सुटणे अशक्य असते. त्यामुळे या व्यक्ती संशोधक, तपास अधिकारी, गुप्तहेर म्हणून चांगले काम करू शकतात.

● यांच्याकडे गुपिते राखण्याचे कसब चांगले असते.

● यांचे व्यक्तिमत्व भारदस्त असते, हे सहसा वजनदार असतात आणि यांचा आवाजही भारदस्त असतो. तुम्हाला जन्मांक 7 असणारी पण किरकोळ शरीरयष्टीची व्यक्ती सहसा सापडणार नाही.

● या व्यक्ती अंतर्मुख असतात.

● या व्यक्ति कोणताही निर्णय खोलवर विचार करून घेत असतात. त्यांच्याकडे इंट्यूशन पॉवर असते, त्यामुळे इतरांना सहसा लक्षात न येणा-या पुढील काळात होऊ शकणाऱ्या गोष्टी यांच्या चटकन लक्षात येतात.

● यांच्याकडे उच्च दर्जाची आध्यात्मिकता असते. त्याचबरोबर दुसऱ्यांना बरे करण्याची क्षमताही (Healing Power) त्यांच्याकडे असते.

● 7 हा अंक ज्ञान, विज्ञान, संशोधन, शिक्षण, अमूर्त संकल्पना, निरीक्षण, विश्लेषण यांच्याशी संबधीत आहे. हा जन्मांक असणाऱ्या व्यक्ति जास्त करून वरील क्षेत्रात आघाडीवर दिसतात.

● सहसा हे लोक समाजापासून अलिप्त रहातात आणि कामाशिवाय फारसा कुणाशी संबंध ठेवत नाहीत. सामाजिक कामांमध्ये हे लोक सहसा दिसत नाहीत.

● स्वत:मध्ये मग्न आणि स्वत:च्या कामात व्यस्त असल्याने या व्यक्तींचे आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष होऊ शकते.

तुमचा जन्मांक 7 असेल तर वरील वैशिष्ठ्ये तुमच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आलेली असतील, तर कांही वैशिष्ठ्ये सुप्त अवस्थेत असतील. पण जन्मांक म्हणजेच सर्व कांही नव्हे. तुमच्यावर पाच कोअर नंबर्सचा मोठा प्रभाव असतो, आणि जन्मांक हा त्यापैकी एक असतो. जन्मांक मुख्य करून स्वभाव वैशिष्ठ्यांशी संबंधित असतो.

लकी नंबर्स
7 व एक अंकी बेरीज 7 येणारे नंबर्स

सुसंगत नंबर्स (Compatible Numbers)
1, 5, 7
विसंगत नंबर्स (Incompatible Numbers)
2, 3, 6, 8

करीअर:
या जन्मांकाच्या व्यक्तींना योग्य असणाऱ्या करिअर्सची माहिती पुढील लिंकवर वाचावी:
अंकशास्त्र: जॉब करावा की व्यवसाय?

जन्मांक 7 असणाऱ्या कांही प्रसिद्ध व्यक्ती:
सर आयझॅक न्यूटन, रविंद्र नाथ टागोर, मादाम मेरी क्युरी, सी. व्ही. रमण, अटल बिहारी वाजपेयी, महेंद्र सिंग धोनी, चार्ली चॅप्लीन, ब्लादिमीर पुतीन, इरफान खान, रामदेव बाबा, नौशाद, कमल हसन.

रविंद्र नाथ टागोर

घरबसल्या न्यूमरॉलॉजी (अंकशास्त्र) शिका

अंकशास्त्र मराठी टेलिग्राम ग्रुप

हेही वाचा

अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा!

अंकशास्त्रानुसार बाळाचे योग्य नाव

Numerology Number 7: Traits of Birth Number /Life Path Number 7 Persons

English Articles on Numerology

अंकशास्त्र: जन्मांक 1: जन्मतारीख 1,10,19,28

अंकशास्त्र: जन्मांक 2: जन्मतारीख 2, 11, 20, 29

अंकशास्त्र: जन्मांक 3: जन्मतारीख 3, 12, 21, 30

अंकशास्त्र: जन्मांक 4 जन्मतारीख 4, 13, 22, 31

अंकशास्त्र: जन्मांक 5 जन्मतारीख 5, 14, 23

अंकशास्त्र: जन्मांक 6 जन्मतारीख 6, 15, 24

अंकशास्त्र: जन्मांक 8 जन्मतारीख 8, 17, 26

अंकशास्त्र: जन्मांक 9 जन्मतारीख 9, 18, 27

यावर आपले मत नोंदवा