तुमचा परफेक्ट आणि बेस्ट लकी मोबाईल फोन नंबर कसा निवडावा?

महावीर सांगलीकर

Senior Numerologist, Graphologist
Mobile Phone: 8149703595

माझे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/numerology.marathi/

(तुमचा लकी मोबाईल फोन नंबर निवडण्यासाठी मी ही प्राथमिक माहिती दिली आहे. या संदर्भातील वैयक्तिक मार्गदर्शनासाठी माझ्याशी सकाळी 11 ते संध्याकाळी 6 या वेळेत संपर्क साधावा).

न्यूमरॉलॉजीमध्ये लकी नंबर्सना फार महत्व आहे. तुमच्या लकी नंबर्समुळे तुमची पॉझिटिव्ह एनर्जी वाढते, तुमचे नकारात्मक विचार दूर होतात, तुमच्याकडे चांगल्या गोष्टी आकर्षित होतात, तुम्हाला येणारे अडथळे कमी होतात आणि तुमची कामे पटापट होऊ लागतात. यामागे तुमच्या लकी नंबर्समुळे तुम्हाला मिळणारे व्हायब्रेशन्स आणि सायकॉलॉजी या दोन्ही गोष्टी काम करतात.

तुमचा जन्मांक किंवा भाग्यांक हा तुमचा लकी नंबर असतो. (अर्थात याला कांही अपवादही असतात).

तुमचा मोबाईल फोन नंबर, तुमच्या गाडीचा नंबर, घर, ऑफीस यांचा नंबर हा तुमचा लकी नंबर असेल तर तुम्हाला त्याचा मोठा फायदा होतो. तुमच्या जन्मांक किंवा भाग्यांकानुसार योग्य लकी मोबाईल फोन नंबर घेतल्यास त्याचा तुम्हाला चांगला लाभ होऊ शकतो. .

मोबाईल फोनचा नंबर 10 अंकी असतो. त्यातील शेवटचे सहा अंकच तुमच्याशी संबधीत असतात. त्या आधीचे अंक एरिया कोड, ऑपरेटर कोड वगैरे असतात. त्यामुळे अंकशास्त्रानुसार मोबाईल फोन नंबर घेताना आधी शेवटच्या सहा अंकाचा विचार केला पाहिजे. त्यानंतर पूर्ण दहा अंकांचाही विचार केला पाहिजे. शेवटच्या सहा अंकाची एक अंकी बेरीज तुमच्या जन्मांक किंवा भाग्यांकाएवढी असली आणि पूर्ण दहा अंकांची एक अंकी बेरीजही तुमच्या जन्मांक किंवा भाग्यांकाएवढी असली तर तो नंबर तुमच्यासाठी लकी नंबर ठरतो. (अर्थात हा लेख भारतातील मोबाईल फोन नंबर्सला अनुसरून लिहिला आहे. त्यामुळे वरील नियम इतर देशांमध्ये बदलू शकतो).

उदाहरणार्थ, तुमची जन्मतारीख 15 जानेवारी 1992 आहे असे समजू. या तारखेनुसार तुमचा जन्मांक 6 आहे (15=1+5=6) तर भाग्यांक 1 आहे. (15.01.1992 = 1+5+0+1+1+9+9+2 =28=2+8 =10=1+0=1).

आता तुमच्यासाठी योग्य नंबर शेवटचे असे सहा अंक असतील की ज्यांची एक अंकी बेरीज 6 किंवा 1 येते, आणि पूर्ण दहा अंकांची एक अंकी बेरीजही 6 किंवा 1 येते.

इथे तुम्ही ही काळजी घ्यायला पाहिजे की शेवटचे सहा अंक आणि पूर्ण दहा अंक लोकांसाठी लक्षात ठेवण्याजोगे असावेत.

वरील जन्मांक 6 किंवा भाग्यांक 1 नुसार योग्य आणि लक्षात ठेवण्यास सोपे नंबर्स (शेवटचे सहा अंक) पुढील प्रमाणे आहेत:

345678
252627
313233
343536
123450
012345
912345
123459
991234
123499

15 जानेवारी 1992 या जन्मतारखेच्या बाबतीत वर दिलेले नंबर्स हे परफेक्ट लकी नंबर्स आहेत. याशिवायही इतर अनेक परफेक्ट लकी नंबर्स आहेत, पण ते सगळे इथे देता येणे शक्य नाही. असे नंबर्स मिळणे ही कठीण गोष्ट असते, किंवा अशा नंबर्ससाठी मोठी किंमत मोजावी लागते. त्यामुळे वरीलपैकी एखादा नंबर न मिळाल्यास ज्या नंबरच्या शेवटच्या सहा अंकांची एक अंकी बेरीज 1 किंवा 6 येते आणि पूर्ण दहा अंकांची बेरीजही 1 किंवा 6 येते असा दुसरा एखादा नंबर घ्यावा.

अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा!

कांही महत्वाच्या सूचना:
वर दिलेले उदाहरण हे 15 जानेवारी 1992 या जन्मतारखेच्या बाबतीत आहे. तुम्ही तुमच्या जन्मतारखेवरून तुमचा जन्मांक व भाग्यांक शोधावा, आणि त्यानुसार योग्य तो नंबर निवडावा.

लकी मोबाईल फोन नंबर शोधण्याची ही जनरल पद्धत आहे. पण याला कांही अपवादही असतात. उदाहरणार्थ, एखाद्याचा जन्मांक आणि भाग्यांक समान असेल, किंवा एखाद्याच्या चार्टमध्ये एखाद्या नंबरचे रिपीटिशन झालेले असेल, एखाद्याचा जन्मांक किंवा भाग्यांक 8 असेल तर त्याचा लकी नंबर शोधण्यासाठी कांही वेगळे नियम लावावे लागतात. तसेच व्यावसायिक वापरासाठी मोबाईल फोन नंबर निवडताना आणखी कांही वेगळ्या निकषांचा विचार करावा लागतो.

मोबाईल फोन, गाड्या, घर, ऑफीस, प्लॉट, जागा यांच्यासाठी लकी नंबर निवडताना अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. या विषयी तुम्हाला मार्गदर्शन हवे असेल तर मला सकाळी 11 ते संध्याकाळी 6 या वेळेत फोन करावा.

माझे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/numerology.marathi/

हेही वाचा:

घरातील एखादी व्यक्ती निघून गेली असल्यास काय करावे?

तुमच्या सहीमध्ये दडलंय तुमच्या यश आणि अपयशाचं रहस्य!

नावाचं स्पेलिंग बदलताय? त्या आधी विचार करा!

English Articles on Modern Numerology

अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा!

अंकशास्त्रानुसार बाळाचे योग्य नाव ठेवण्यासाठी……

Join my Numerology & Graphology Channel at Telegram:
https://t.me/mahaveersanglikar

अंकशास्त्र मराठी टेलिग्राम ग्रुप

3 thoughts on “तुमचा परफेक्ट आणि बेस्ट लकी मोबाईल फोन नंबर कसा निवडावा?

यावर आपले मत नोंदवा