तुमचा जन्मांक, भाग्यांक आणि तुम्हाला फायदेशीर ठरणारी करिअर्स | जॉब करावा की व्यवसाय?

© महावीर सांगलीकर

Numerologist, Graphologist
Cell Phone Number 8149703595

हा लेख इंग्रजीमध्ये वाचण्यासाठी येथे क्लिक करा: What is the Right Career For You, According to Numerology ?

तुम्ही जॉब करावा की व्यवसाय? जॉब करायचा असल्यास तो कोणत्या प्रकारचा करावा? स्वत:चा व्यवसाय करायचा असल्यास कोणता व्यवसाय करावा? या संदर्भात अंकशास्त्रानुसार योग्य मार्गदर्शन करता येते.

तुमच्या जन्मांक आणि भाग्यांकाला अनुकूल असे अनेक जॉब्स आणि व्यवसाय असतात. तुम्ही तुमचे करीअर त्यानुसार निवडले तर तुम्हाला त्यात जास्त यश मिळू शकते. याउलट तुमच्या जन्मांकाला किंवा भाग्यांकाला अनुकूल नसणारे करीअर करायला तुम्ही गेलात तर त्यात तुम्हाला पाहिजे तेवढे यश मिळणार नाही. किंबहुना तुम्हाला अपयश येण्याचीच जास्त शक्यता असते.

इथे मी अंक आणि त्यांच्याशी संबधीत करीअरची थोडक्यात माहिती दिली आहे. वैयक्तिक मार्गदर्शनासाठी तुम्ही माझ्याशी संपर्क साधावा, कारण अचूक करीअर सांगण्यासाठी त्या त्या व्यक्तिचा जन्मांक आणि भाग्यांक कॉम्बिनेशनचा आणि इतर अनेक गोष्टींचा सूक्ष्म विचार करावा लागतो, तसेच इतरही कांही अंक लक्षात घ्यावे लागतात.

तुमचा जन्मांक आणि भाग्यांक हा तुमच्या जन्मतारखेनुसार ठरतो.
जन्मांक: तुम्ही कोणत्याही महिन्याच्या ज्या तारखेस जन्माला असाल ती तारीख 1 ते 9 पर्यंत असेल तर ती तारीख हाच तुमचा जन्मांक असतो. उदा. तुम्ही 1 तारखेस जन्मला असाल तर तुमचा जन्मांक 1 असतो, 2 तारखेस जन्मला असाल तर तुमचा जन्मांक 2 असतो. जर तुमची जन्मतारीख 11 ते 31 पैकी असेल तर त्या तारखेतील अंकांची येणारी बेरीज हा तुमचा जन्मांक असतो. उदा. तुमची जन्मतारीख 15 असेल तर 1+5 = 6 हा तुमचा जन्मांक असतो.
भाग्यांक: तुमच्या पूर्ण जन्मतारखेतील अंकाची येणारी बेरीज म्हणजे तुमचा भाग्यांक. उदा. समजा तुमची जन्मतारीख 15.07.1994 आहे. यातील अंकांची बेरीज 36 येते. ही बेरीज दोन अंकात आहे. या अंकांची पुन्हा बेरीज करावी. 3+6 = 9, म्हणून 9 हा तुमचा भाग्यांक आहे.

अंक आणि करीअर

जन्मांक किंवा भाग्यांक 1:
1 हा अंक नेतृत्वाशी संबधित आहे. त्यामुळे ज्या व्यवसायात किंवा जॉबमध्ये नेतृत्वगुणाची गरज असते, असे करीअर जन्मांक किंवा भाग्यांक 1 असणाऱ्याना चांगले असते. हे लोक ऑर्डर घेण्यासाठी नव्हे तर ऑर्डर देण्यासाठी, इतरांच्याकडून कामे करवून घेण्यासाठी जन्माला आलेले असतात. बॉस किंवा मालक बनणे हेच यांना जास्त अनुकूल असते. राजकीय नेतृत्व, टीम लीडरशीप, व्यवस्थापन, मोठे उद्योग यात करीअर करणे यांना जास्त चांगले. वहातूक, प्रवास यांच्याशी संबंधीत व्यवसायात यांना चांगले यश मिळू शकते. पोलीस किंवा सैन्य अधिकारी म्हणून, प्रशासकीय अधिकारी म्हणून हे यशस्वी होऊ शकतात. रिअल इस्टेट, कन्स्ट्रक्शन व्यवसाय यात यांना यश मिळते. हे लोक चांगले इंजिनिअर बनू शकतात. खेळाडू आणि सांघिक खेळांचे कप्तान बनू शकतात. त्याचप्रमाणे हे लोक संशोधक, इंजिनिअर आदी बनू शकतात.

उद्योजक-व्यावसायिक, राजकीय व वैज्ञानिक जगातील सर्वाधिक यशस्वी व्यक्तींमध्ये जन्मांक किंवा भाग्यांक 1 असणाऱ्यांची संख्या प्रमाणापेक्षा जास्त आहे. उदा. फोर्ब्सच्या 2019 च्या जगातील सर्वात श्रीमंत पहिल्या 30 व्यक्तींमध्ये जन्मांक किंवा भाग्यांक 1 असणाऱ्यांची संख्या 12 आहे! (म्हणजे 40 टक्के!).

1 या जन्मांकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पुढील लेख वाचा: जन्मांक 1: जन्मतारीख 1, 10, 19, 28

अंकशास्त्र मराठी टेलिग्राम ग्रुप

जन्मांक किंवा भाग्यांक 2:
हा अंक कला, संभाषण चातुर्य, मध्यस्थी यांच्याशी संबधीत आहे. सल्लागार, विक्रेते, चित्रकार, डिझायनर, आर्किटेक्ट, फ्लोरिस्ट, फोटोग्राफर, मध्यस्थ, सेल्स पर्सन, शिक्षक, ट्रेनर, मार्केटिंग मॅनेजर या प्रकारचे करीअर यांना यश देते. हे लोक चांगले आणि यशस्वी डॉक्टर्स बनू शकतात. तसेच चांगले सहाय्यक, सचिव, सेक्रेटरी, वकील बनू शकतात. जन्मांक 2 असेल आणि भाग्यांक 1 किंवा 9 असेल तर अशी व्यक्ती राजकीय किंवा इतर क्षेत्रात नेतृत्व करण्यात खूप यशस्वी होऊ शकते. जन्मतारीख 11 किंवा 29 असेल किंवा पूर्ण जन्मतारखेची बेरीज 11 किंवा 29 येत असेल तर अशी व्यक्ती आध्यात्मिक क्षेत्रात किंवा मनोरंजन क्षेत्रातही खूप पुढे जाऊ शकते.

2 या जन्मांकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पुढील लेख वाचा: जन्मांक 2: जन्मतारीख 2, 11, 20, 29

जन्मांक किंवा भाग्यांक 3:
3 हा अंक व्यक्त होण्याशी संबधीत आहे. अभिनय, मनोरंजन, परफॉर्मिंग आर्ट्स, लेखन, कला, पब्लिक रिलेशन्स या प्रकारचे करीअर यांना जास्त चांगले. सिनेसृष्टीत अभिनय क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्यात, तसेच परफॉर्मिंग आर्टिस्ट्समध्ये जन्मांक किंवा भाग्यांक 3 असणाऱ्यांचे प्रमाण इतरांपेक्षा जास्त आहे.

हे लोक इतरांना चांगल्या प्रकारे मोटीव्हेट करू शकतात, त्यामुळे मोटीव्हेटर, लाईफ कोच असे करीअरही यांना चांगले यश देऊ शकते. हे लोक चांगले आणि यशस्वी डॉक्टर्स बनू शकतात, तसेच सेनाधिकारीही बनू शकतात.

3 या जन्मांकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पुढील लेख वाचा: जन्मांक 3: जन्मतारीख 3, 12, 21, 30

अंकशास्त्र मराठी टेलिग्राम ग्रुप

जन्मांक किंवा भाग्यांक 4:
हा अंक तर्कनिष्ठ विचार, गणित, टेक्नॉलॉजी यांच्याशी संबधीत आहे. त्यामुळे पत्रकारिता, संशोधन, संपादन, गणिताशी संबधीत व्यवसाय, इंजिनिरिंग, आर्किटेक्चर असे करीअर यांच्यासाठी चांगले ठरते. संशोधक, डिटेक्टिव्ह, तपास अधिकारी, वकील म्हणून हे चांगले काम करू शकतात. चांगले मेकॅनिक्स बनू शकतात. शिक्षकी पेशाही यांच्यासाठी चांगला ठरतो. शिवाय हे लोक शैक्षणिक संस्था चालवण्यामध्ये खूप यशस्वी होऊ शकतात. त्याच प्रमाणे कंस्ट्रक्शन व्यवसायामध्ये यांना चांगले यशे मिळू शकते, विशेषतः यांची जन्मतारीख 22 असेल किंवा पूर्ण जन्मतारखेची बेरीज 22 असेल तर.

4 या जन्मांकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पुढील लेख वाचा: जन्मांक 4 जन्मतारीख 4, 13, 22, 31

जन्मांक किंवा भाग्यांक 5
हा अंक मल्टिटॅलेंटेड लोकांचा अंक आहे. प्रचंड बुद्धिमत्ता, झटपट विचार करण्याची क्षमता आणि भाषेवरील कमांड ही यांची वैशिष्ठ्ये आहेत. शिवाय हे लोक चांगल्या प्रकारे व्यक्त होऊ शकतात. त्यामुळे अभिनय, पब्लिक स्पीकिंग, संशोधन, कला, संगीत, निर्मिती, उद्योग-व्यवसाय, लिखाण, पत्रकारिता असे अनेक करिअर्स यांना चांगले यश देतात. संशोधक, डिटेक्टिव्ह, गुप्तहेर, तपास अधिकारी म्हणून हे चांगले काम करू शकतात. वहातूक, प्रवास यांच्याशी संबंधीत व्यवसायात यांना चांगले यश मिळू शकते.

5 या जन्मांकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पुढील लेख वाचा: जन्मांक 5 जन्मतारीख 5, 14, 23

अंकशास्त्र मराठी टेलिग्राम ग्रुप

जन्मांक किंवा भाग्यांक 6:
6 हा अंक जबाबदार आणि कुटुंबवत्सल लोकांचा अंक आहे. यांना डिझायनिंगशी संबंधीत करीअर (फॅशन डिझायनिंग, आर्किटेक्चर, प्रोडक्ट डिझायनिंग, कमर्शिअल आर्ट, प्रिंटिंग इत्यादि). जबाबदारीच्या पदावरील नोकरी करणे चांगले असते. हे लोक मॅन्युफॅक्चरिंगमध्येही चांगले यशस्वी होऊ शकतात. तसेच फूड बिझनेस व फूड प्रोडक्ट्स या गोष्टीही यांना चांगले यश देतात.

6 या जन्मांकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पुढील लेख वाचा: जन्मांक 6 जन्मतारीख 6, 15, 24

जन्मांक किंवा भाग्यांक 7:
7 हा अंतर्मुख आणि गुप्तता बाळगणाऱ्या लोकांचा अंक आहे. यांची निरीक्षण व विश्लेषण करण्याची क्षमता जबरदस्त असते. हे लोक यशस्वी गुप्तहेर, डिटेक्टिव्ह, तपास अधिकारी, संशोधक, लेखक, संगीतकार, शिक्षक, ट्रेनर इत्यादी बनू शकतात. याशिवाय हे लोक चांगले डॉक्टर्स बनू शकतात.

जन्मांक किंवा भाग्यांक 7 असणाऱ्या लोकांच्यात लोकांना बरे करण्याची उपजत शक्ती असते. (Healing Power). त्यामुळे ते उत्तम रेकी मास्टर्स, स्पिरिच्युअल हीलर्स वगैरे बनू शकतात.

7 या जन्मांकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पुढील लेख वाचा: जन्मांक 7 जन्मतारीख 7, 16, 25

अंकशास्त्र मराठी टेलिग्राम ग्रुप

जन्मांक किंवा भाग्यांक 8:
8 हा अंक धन, सत्ता आणि संपत्ती यांच्याशी संबंधित आहे. तसेच हा अंक व्यवस्थापन कौशल्याशी संबंधित आहे. जन्मांक किंवा भाग्यांक 8 असणारी व्यक्ती एक उत्तम ऍडमिनिस्ट्रेटर किंवा मॅनेजर आदी बनू शकते. प्रशासकीय अधिकारी म्हणून यशस्वी होऊ शकते. जबाबदारीच्या आणि सत्तेच्या पदावरील नोकरी चांगल्या प्रकारे करू शकतात. याशिवाय राजकारणात देखील यांना चांगले यश मिळू शकते. पैशांच्या व्यवस्थापनात या व्यक्ती कुशल असतात, त्यामुळे त्या फंड मॅनेजर म्हणून चांगले काम करू शकतात.

यांना कंस्ट्रक्शन व्यवसायात मोठे यश मिळू शकते.

जन्मांक 8 आणि भाग्यांक 9 असेल तर त्या व्यक्ती सामाजिक व मानवतावादी कामात खूप मोठे यश मिळवू शकतात.

8 या जन्मांकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पुढील लेख वाचा: जन्मांक 8 जन्मतारीख 8, 17, 26

जन्मांक किंवा भाग्यांक 9:
9 हा जन्मांक किंवा भाग्यांक असणाऱ्या व्यक्तिंना मोठे उद्योग, रिअल इस्टेट, कंस्ट्रक्शन, रस्ते बांधणी, बांधकाम साहित्याची निर्मिती आणि विक्री (धातू, वाळू, दगड, मुरूम आदी). जमिनीशी संबंधित कोणत्याही व्यवसायात यांना मोठे यश मिळू शकते. उदा. जमिनीची खरेदी-विक्री शेती, खाण व्यवसाय, इत्यादी).

पोलीस किंवा सैन्य अधिकारी म्हणून, प्रशासकीय अधिकारी म्हणून हे यशस्वी होऊ शकतात. तसेच यांना राजकीय नेतृत्व करण्यात यश मिळू शकते.

9 या जन्मांकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पुढील लेख वाचा: जन्मांक 9 जन्मतारीख 9, 18, 27

जन्मांक किंवा भाग्यांक 11:
यांना जन्मांक/भाग्यांक 2 चे सगळे करिअर्स यश देऊन जातात, शिवाय हे महान तत्वज्ञानी, आध्यात्मिक गुरु, स्पिरिच्युअल हिलर्स बनू शकतात.

जन्मांक किंवा भाग्यांक 13:
यांना जन्मांक/भाग्यांक 4 चे सर्व करिअर्स चांगली ठरतात. शिवाय गूढ विद्या, हिप्नॉटिझम, रेकी, स्पिरिच्युअल हिलिंग, मॅजिक या क्षेत्रात चांगले यश मिळू शकते.

जन्मांक किंवा भाग्यांक 22:
यांना जन्मांक/भाग्यांक 4 चे सर्व करिअर्स चांगली आहेत. शिवाय शिक्षणक्षेत्र, NGO, कन्स्ट्रक्शन, राजकारण यात त्यांना मोठे यश मिळू शकते.

जन्मांक किंवा भाग्यांक 26:
यांना जन्मांक/भाग्यांक 8 आणि 13 ची सर्व करिअर्स चांगली असतात, शिवाय हे लोक महान मानवतावादी कामे यशस्वी रित्या करू शकतात.

अंकशास्त्र मराठी टेलिग्राम ग्रुप

हेही वाचा:

लग्नानंतर नाव बदलताय? या गोष्टी लक्षात ठेवा!

तुमच्या सहीमध्ये दडलंय तुमच्या यश आणि अपयशाचं रहस्य!

राशिभविष्य वाचू नका!

नावाचं स्पेलिंग बदलताय? त्या आधी विचार करा!

अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा!

अंकशास्त्रानुसार बाळाचे योग्य नाव ठेवण्यासाठी……

बिझनेस न्यूमरॉलॉजी: तुमच्या व्यवसायाला बरकत आणा!

2 thoughts on “तुमचा जन्मांक, भाग्यांक आणि तुम्हाला फायदेशीर ठरणारी करिअर्स | जॉब करावा की व्यवसाय?

यावर आपले मत नोंदवा