अंकशास्त्र: जन्मांक 9 जन्मतारीख 9, 18, 27

महावीर सांगलीकर

Numerologist, Graphologist & Face Reader
Cell Phone Number 8149703595

कोणत्याही महिन्याच्या 9, 18, किंवा 27 तारखेस जन्मलेल्या सगळ्यांचा जन्मांक 9 असतो.

जन्मांक 9 असणा-या व्यक्तीमध्ये जन्मांक 1 चे अनेक गुण दिसून येतात. जन्मांक 1 सारखेच प्रचंड आत्मविश्वास, आक्रमकता, साहसीपणा, लढाऊपणा हे गुण जन्मांक 9 मध्ये दिसून येतात. पण जन्मांक 9 असणाऱ्या व्यक्तिंना जन्मांक 1 असणा-या व्यक्तिंसारखे झटपट यश मिळत नाही तर उशीरा मिळत असते. याचे कारण म्हणजे हा अंक उशीर लावणारा अंक आहे. पण हळूहळू का होईना, या व्यक्ती जीवनात मोठी प्रगती करू शकतात.

यांना आयुष्यात खूप संघर्ष करावा लागतो.

जन्मांक असणाऱ्याचं आणखी एक वैशिष्ठय म्हणजे या जन्मांक 9 असणा-या व्यक्ति मानवतावादी, दयाळू आणि क्षमाशील असतात. त्यांच्याकडे समाजाच्या भल्यासाठी लागणारी दूरदृष्टी आणि आदर्श असतात. या व्यक्ति नम्र आणि निस्वार्थी असतात. इतरांच्या भल्यासाठी त्याग करण्याची वृत्ती त्यांच्यात असते. ते उदारहृदयी असतात आणि आपल्याकडे जे कांही आहे ते इतरांना देण्याची त्यांची वृत्ती असते. आपल्या भोवतालच्या लोकांबद्दल त्यांना प्रचंड प्रेम असते आणि त्यांची काळजी वाहण्याची या व्यक्तींची प्रवृत्ती असते.

यांच्याकडे प्रचंड सहनशक्ती असते. तसेच त्यांच्याकडे कल्पनाशक्ती आणि नवनिर्मिती हे गुणही असतात.

यांच्या कोअर नंबर्समध्ये चार्टमध्ये 7, 8, 11 यापैकी एखादा अंक आला असेल किंवा 9 या अंकाचे रिपीटिशन झाले असेल तर हे जास्तच आध्यात्मिक असतात. त्याचप्रमाणे यांचा ऑकल्ट सायन्सेस (गूढ विद्या) कडे ओढा असतो.

जन्मांक असणाऱ्या लोकांचे इतरांपेक्षा जास्त प्रमाणात अपघात होत असल्याचे दिसतात. त्यामुळे या लोकांनी वाहने जपून चालवली पाहिजेत, व इतर ठिकाणीही योग्य ती काळजी घेतली पाहिजे.

मोठे प्रोजेक्ट, मोठ्या व अवजड उद्योगात, जमिनीशी संबंधित उद्योगात यांना मोठे यश मिळते. या व्यक्ति कला, साहित्य, संगीत इत्यादी क्षेत्रातही आपला ठसा उमटवू शकतात.

लकी नंबर्स:
9 व एक अंकी बेरीज 9 येणारे अंक

सुसंगत नंबर्स (Compatible Numbers)
3, 6, 9

विसंगत नंबर्स (Incompatible Numbers)
4, 8

करीअर:
या जन्मांकाच्या व्यक्तींना योग्य असणाऱ्या करिअर्सची माहिती पुढील लिंकवर वाचावी:
अंकशास्त्र: जॉब करावा की व्यवसाय?

(सूचना: प्रत्येक व्यक्तीवर जन्मांकाबरोबरच इतर कोअर नंबर्सचा देखील प्रभाव असतो, त्यामुळे या अंकाचे गुणदोष कमी-जास्त होऊ शकतात).

जन्मांक 9 असणा-या कांही प्रसिद्ध व्यक्ति: राम कृष्ण परमहंस, नेल्सन मंडेला, लिओ टॉलस्टॉय, आचार्य आनंद ऋषि, विजया लक्ष्मी पंडीत, गॅलिलिओ, बरट्रांड रसेल, टॉम हॅन्क्स, ब्रॅड पिट.

घरबसल्या न्यूमरॉलॉजी (अंकशास्त्र) शिका

अंकशास्त्र मराठी टेलिग्राम ग्रुप

हेही वाचा

अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा!

अंकशास्त्रानुसार बाळाचे योग्य नाव

English Articles on Numerology

अंकशास्त्र: जन्मांक 1: जन्मतारीख 1,10,19,28

अंकशास्त्र: जन्मांक 2: जन्मतारीख 2, 11, 20, 29

अंकशास्त्र: जन्मांक 3: जन्मतारीख 3, 12, 21, 30

अंकशास्त्र: जन्मांक 4 जन्मतारीख 4, 13, 22, 31

अंकशास्त्र: जन्मांक 5 जन्मतारीख 5, 14, 23

अंकशास्त्र: जन्मांक 6 जन्मतारीख 6, 15, 24

अंकशास्त्र: जन्मांक 7 जन्मतारीख 7, 16, 25

अंकशास्त्र: जन्मांक 8 जन्मतारीख 8, 17, 26

1 thoughts on “अंकशास्त्र: जन्मांक 9 जन्मतारीख 9, 18, 27

यावर आपले मत नोंदवा