अंकशास्त्र: जन्मांक 3: जन्मतारीख 3, 12, 21, 30

महावीर सांगलीकर

Numerologist & Graphologist
Cell Phone 8149703595

ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला झाला असेल, त्या सर्वांचा जन्मांक 3 असतो.

न्यूमरॉलॉजीमध्ये या अंकाला ‘एंटरटेनर नंबर’ म्हणून ओळखले जाते. मनोरंजन क्षेत्रात या जन्मांकाचे लोक मोठ्या प्रमाणावर दिसतात. अभिनय, गायन, संगीत, वादन, लेखन आणि इतर परफॉर्मिंग आर्ट्समध्ये या व्यक्ती प्रसिद्ध झालेल्या दिसतात.

यांच्याकडे संवादकौशल्य असते. त्याचप्रमाणे हजरजबाबीपणाही असतो. आपले विचार आणि मते स्पष्टपणे व्यक्त करण्याची हातोटी त्यांच्याकडे असते. त्यामुळे त्यांच्या बोलण्याचा इतरांवर मोठा प्रभाव पडत असतो.

यांचे व्यक्तिमत्वही आकर्षक असते.

हे लोक ‘मोस्ट फ्रेंडली’ असतात. यांच्या मैत्रीपूर्ण वागण्यामुळे, प्रभावी बोलण्यामुळे आणि आकर्षक व्यक्तिमत्वामुळे यांचा मित्रपरिवार आणि लोकसंग्रह वाढत जातो.

या व्यक्ति अतिशय महत्वाकांक्षी आणि प्रचंड इच्छा शक्ती असणा-या असतात. त्यांना दुय्यम भूमिका करणे आवडत नाही आणि ते सतत आपल्या क्षेत्रात एक नंबरवर पोहोचण्यासाठी धडपड करत असतात, आणि त्यात ते यशस्वी होतातही. सर्वोच्च असण्यातली ताकत त्यांना माहीत असते आणि ती ताकत कशी वापरायाची हेही त्यांना चांगलेच कळते.

त्यांच्या प्रगल्भ आणि स्पष्ट विचारांमुळे, ज्ञानामुळे आणि तर्कबुद्धीमुळे लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात. समाजात त्यांना मान मिळतो.

या व्यक्ति संयमी, सहनशील, धैर्यवान आणि कष्टाळू असतात. पण ते एकावेळी अनेक योजना राबवण्याच्या भानगडीत पडतात, त्यामुळे त्यांची अवस्था ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ अशी होण्याची शक्यता असते.

आपल्या सहका-यांनी आपल्या आज्ञा ऐकाव्यात अशी त्यांची अपेक्षा असते, आणि ते सहकारी अशा आज्ञा ऐकतातही.

यांच्या प्रेमळ स्वभावामुळे आणि आकर्षण शक्तीमुळे भिन्नलिंगी व्यक्ती यांच्याकडे सहजपणे आकर्षित होतात. यातून यांची लव्ह अफेअर्स होण्याची शक्यता असते.

यांना नाही म्हणायची सवय नसते. त्यामुळे ते आश्वासने देऊन बसतात, पण प्रत्यक्षात ती पुरी करत नाहीत/ करू शकत नाहीत.

यातील कित्येकांना कामापेक्षा गप्प-गोष्टींचे वेड असते, त्यामुळे त्यांच्या आयुष्यातला बराच वेळ वाया जायची शक्यता असते.

लकी नंबर्स
3 व एक अंकी बेरीज 3 येणारे अंक

सुसंगत नंबर्स (Compatible Numbers)
3, 6, 9
विसंगत नंबर्स (Incompatible Numbers)
4, 7, 8

करीअर:
या जन्मांकाच्या व्यक्तींना योग्य असणाऱ्या करिअर्सची माहिती पुढील लिंकवर वाचावी:
अंकशास्त्र: जॉब करावा की व्यवसाय?

जन्मांक 3 असणा-या कांही प्रसिद्ध व्यक्ति:
जिजामाता, स्वामी विवेकानंद, अब्राहम लिंकन, जोसेफ स्टालिन, सर विन्स्टन चर्चिल, डार्विन, हेनरी फोर्ड, होमी भाभा, विक्रम साराभाई, रजनीकांत, शरद पवार, टॉम क्रूज

(सूचना: प्रत्येक व्यक्तीवर जन्मांकाबरोबरच इतर कोअर नंबर्सचा देखील प्रभाव असतो, त्यामुळे या अंकाचे गुणदोष कमी-जास्त होऊ शकतात).

घरबसल्या न्यूमरॉलॉजी (अंकशास्त्र) शिका

अंकशास्त्र मराठी टेलिग्राम ग्रुप

हेही वाचा

अंकशास्त्र: जन्मांक 1: जन्मतारीख 1,10,19,28

अंकशास्त्र: जन्मांक 2: जन्मतारीख 2, 11, 20, 29

जन्मांक 4 जन्मतारीख 4, 13, 22, 31

जन्मांक 5 जन्मतारीख 5, 14, 23

जन्मांक 6 जन्मतारीख 6, 15, 24

जन्मांक 7 जन्मतारीख 7, 16, 25

जन्मांक 8 जन्मतारीख 8, 17, 26

जन्मांक 9 जन्मतारीख 9, 18, 27

अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा!

अंकशास्त्रानुसार बाळाचे योग्य नाव

English Articles on Numerology

2 thoughts on “अंकशास्त्र: जन्मांक 3: जन्मतारीख 3, 12, 21, 30

यावर आपले मत नोंदवा