अंकशास्त्र: जन्मांक 2: जन्मतारीख 2, 11, 20, 29

महावीर सांगलीकर

Numerologist, Graphologist & Face Reader
Cell Phone Number 8149703595

ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 तारखेस झाला असेल, त्या सर्वांचा जन्मांक 2 असतो. या व्यक्तिंची मुख्य वैशिष्ठ्ये म्हणजे त्या हसतमुख, मनमिळाऊ आणि मृदुभाषी असतात. त्या बहुधा भांडणतंटे, वादविवाद यापासून दूर रहातात. त्यांना टीका करायला सहसा आवडत नाही. त्यांच्या या उपजत गुणामुळं या व्यक्ति उत्कृष्ट मध्यस्थ, मुत्सद्दी, विक्रेते, सल्लागार, समुपदेशक बनू शकतात. त्याशिवाय या व्यक्तिंच्याकडे उत्कृष्ट सौंदर्यदृष्टी आणि क्रिएटीव्हिटी असते, त्यांना विविध कलांची चांगली जाण असते. या व्यक्ति सहजपणे नवे मित्र बनवतात.

या व्यक्तिंची दुसरी बाजू म्हणजे त्या अतिसंवेदनशील, भावूक आणि मूडी असतात, अगदी छोट्या कारणामुळं त्यांचा मूड ऑफ होवू शकतो, त्यांना नैराश्य येऊ शकते. धरसोडपणा आणि चंचलता हे त्यांचे ठळक दोष आहेत. भिन्नलिंगी व्यक्तिकडे सहजपणे आकर्षित होणे हा त्यांचा आणखीन एक दोष आहे.

रोमँँटिक वागणं हा यांचा एक विशेष गुण आहे. सहसा यांचा प्रेमविवाह होतो. लव्ह अफेअर्स होऊ शकतात.

आपल्या मनासारखं न झाल्यास यांना मोठं डिप्रेशन येण्याची शक्यता असते. डिप्रेशनमध्ये आत्महत्या करणारांच्यात जन्मांक 2 च्या व्यक्ती जास्त प्रमाणात दिसतात.

जन्मांक 2 असणा-यांपैकी ज्यांचा जन्म 11 किंवा 29 तारखेस झाला आहे, त्या भाग्यवान म्हणायला पाहिजे, कारण 11 हा एक मास्टर नंबर आहे. 29 या तारखेतल्या अंकाची बेरीजही 11 येते. या व्यक्ति उच्च आध्यात्मिक पातळी असणाऱ्या असतात, किंवा धार्मिक असतात. या तारखांची निगेटिव्ह बाजू म्हणजे त्यांच्यापैकी अनेकजण धर्म, कर्मकांड, पूजाअर्चा याच्या अतिआहारी गेलेले असतात.

जन्मांक 2 असणा-या कांही प्रसिद्ध व्यक्ति म्हणजे महात्मा गांधी, ओशो, लाल बहादूर शाष्त्री, थॉमस अल्वा एडिसन, जॉन एफ. केनेडी, मिखाईल गोर्बाचेव्ह, राजीव गांधी, आंद्रे आगासी, आशा पारेख, दिलीप कुमार, अमिताभ बच्चन, शाहरुख खान.

महात्मा गांधी जन्मतारीख 2, जन्मांक 2

लकी नंबर्स
2 व एक अंकी बेरीज 2 येणारे नंबर्स (11, 20, 29……. 101 ….200 वगैरे).

सुसंगत नंबर्स (Compatible Numbers)
2, 4, 8

विसंगत नंबर्स (Incompatible Numbers)
1, 5, 7

करीअर:
या जन्मांकाच्या व्यक्तींना योग्य असणाऱ्या करिअर्सची माहिती पुढील लिंकवर वाचावी:
अंकशास्त्र: जॉब करावा की व्यवसाय?

(सूचना: प्रत्येक व्यक्तीवर जन्मांकाबरोबरच इतर कोअर नंबर्सचा देखील प्रभाव असतो, त्यामुळे जन्मांकाचे गुणदोष कमी-जास्त होऊ शकतात).

घरबसल्या न्यूमरॉलॉजी (अंकशास्त्र) शिका

अंकशास्त्र मराठी टेलिग्राम ग्रुप

हेही वाचा:

अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा!

अंकशास्त्रानुसार बाळाचे योग्य नाव

राशिभविष्य वाचू नका!

अंकशास्त्र: जन्मांक 1: जन्मतारीख1, 10, 19, 28

अंकशास्त्र: जन्मांक 3: जन्मतारीख 3, 12, 21, 30

अंकशास्त्र: जन्मांक 4 जन्मतारीख 4, 13, 22, 31

अंकशास्त्र: जन्मांक 5 जन्मतारीख 5, 14, 23

अंकशास्त्र: जन्मांक 6 जन्मतारीख 6, 15, 24

अंकशास्त्र: जन्मांक 7 जन्मतारीख 7, 16, 25

अंकशास्त्र: जन्मांक 8 जन्मतारीख 8, 17, 26

यावर आपले मत नोंदवा