अंकशास्त्र: जन्मांक 1: जन्मतारीख 1, 10, 19, 28

महावीर सांगलीकर

Numerologist, Graphologist & Face Reader
Cell Phone Number 8149703595

कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 किंवा 28 तारखेस जन्मलेल्या व्यक्तिंचा जन्मांक 1 असतो. मोठमोठे नेते, लढाऊ राजे, सेनापती, उद्योजक, वेगवेगळ्या क्षेत्रात नवीन कांहीतरी करणारे यांच्यात 1 जन्मांक असणा-या लोकांची संख्या जास्त प्रमाणावर दिसते. या अंकाला ‘विजेता अंक’ (Winner Number) म्हणता येईल.

विजेता नंबर

जन्मांक 1 असणा-या व्यक्ति उपजतपणे नेतृत्वगुण असणा-या आणि महत्वाकांक्षी असतात. त्यांचं मुख्य ध्येय आपापल्या क्षेत्रात एक नंबरला पोहोचणं हे असतं. या व्यक्ति अगदी गल्लीतल्या क्रिकेट टीममध्ये असल्या, तरी तिथं त्या कॅप्टन असण्याची जास्त शक्यता असते, किंवा त्यांचं ध्येय कॅप्टन होण्याचं असतं. नोकर असण्यापेक्षा बॉस असणं त्यांना जास्त भावतं. इतरांच्या हाताखाली काम करणं, दुय्यम स्थान स्वीकारणं त्यांना आवडत नाही. इतरांच्यावर सत्ता गाजवण्याची उपजत महत्वाकांक्षा त्यांच्यात असते.

त्यांच्याकडं उत्कृष्ट व्यवस्थापन कौशल्य असतं. लोकांच्याकडून कामं करवून घेणं यांना चांगलंच जमतं. पण यांच्याकडून आपल्या हाताखालील लोकांवर बॉसिंग होण्याचीही शक्यता असते.

या व्यक्तींना प्रचंड आत्मविश्वास असतो आणि तो त्यांच्या बोलण्यातून आणि बॉडी लँग्वेजमधून ठळकपणे जाणवत असतो. त्यांना पाहिजे असलेली गोष्ट या व्यक्ति मिळवतातच.

त्यांचं रहाणीमान उच्च दर्जाचे असतं. या व्यक्ति भौतिक यशाला सर्वाधिक महत्व देतात. त्यांना पैसा, संपत्ती आणि आरामदायक जीवन यांची आवड असते. त्यांना चांगल्यातल्या चांगल्या वस्तूंची आवड असते. जसे, ते महागडे घर, महागडी कार खरेदी करतील, फिरायला दुसरीकडे जातील तेंव्हा तेथे महागड्या हॉटेलमध्ये रहातील, महागडे जेवण घेतील, आपल्या मुलांना शहरातील सगळ्यात चांगल्या शाळेत दाखल करतील.

या व्यक्ति आपापल्या क्षेत्रात नव्या युगाची सुरवात करणाऱ्या असतात. त्या दिलदार, अनेकांच्या पोशिंद्या, सगळ्यांना सांभाळून घेणाऱ्या या असतात. कुणावर अन्याय झालेला त्यांना खपत नाही. अगदी त्यांच्या शत्रूवरही अन्याय होत असेल तरी त्यांना ते रुचत नाही.

जन्मांक 1 असणा-या व्यक्तिशी कुणी शत्रूत्व पत्करले, तर त्या शत्रूचा पाडाव होणार हे नक्की असते. पण विशेष म्हणजे शत्रूनं चांगली लढत दिल्यास त्याचं कौतुक करण्याचा दिलदारपणा देखील त्यांच्यात असतो. कुणी दगाबाजी केल्यास या व्यक्ति त्याचा निर्दयपणे बंदोबस्त करतात.

त्यांचे स्पर्धक किंवा शत्रू त्यांच्या विरोधात गुप्त कारवाया करण्याची शक्यता असते, पण जन्मांक 1 च्या व्यक्ती सहसा आपल्या शत्रूंना पुरून उरतात.

या व्यक्ति आपल्या आयुष्यात परफेक्ट हिरो अथवा परफेक्ट व्हिलन बनण्याची शक्यता असते.

या जन्मांकामध्ये 19 तारखेला जन्मलेल्या व्यक्तीं राजकीय नेतृत्वात जास्त यशस्वी होण्याची शक्यता असते, तर 28 तारखेला जन्मलेल्या व्यक्ती, तर 28 तारखेस जन्मलेल्या बिझनेसमॅन म्हणून जास्त यशस्वी होण्याची शक्यता असते.

जन्मांक 1 असणा-या व्यक्तिंमध्येवरील गुण असले तरी कांही दुर्गुणही असतात. हे लोक आक्रमक प्रवृत्तीचे असतात. तडजोड करणं त्यांना मान्य नसते. ते बऱ्याचदा ताठ प्रवृत्तीचे आणि जेलस असतात. ते स्वकेंद्रित असतात. त्यांच्याकडून आपल्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांवर बॉसिंग होण्याची शक्यता असते.

हेच गुणदोष भाग्यांक 1 असणा-या व्यक्तींमध्येही दिसून येतात.

(सूचना: प्रत्येक व्यक्तीवर जन्मांकाबरोबरच इतर कोअर नंबर्सचा देखील प्रभाव असतो, त्यामुळे या अंकाचे गुणदोष कमी-जास्त होऊ शकतात).

लकी नंबर्स
1 व एक अंकी बेरीज 1 येणारे नंबर्स (उदा. 1234 = 1+2+3+4 = 10 = 1+0 = 1), म्हणून 1234 हा एक लकी नंबर).

फ्रें

सुसंगत नंबर्स (Compatible Numbers)
1, 5, 7
विसंगत नंबर्स (Incompatible Numbers)
2, 6, 6


करीअर:
या जन्मांकाच्या व्यक्तींना योग्य असणाऱ्या करिअर्सची माहिती पुढील लिंकवर वाचावी:
अंकशास्त्र: जॉब करावा की व्यवसाय?

जन्मांक 1 असणा-या कांही प्रसिद्ध व्यक्ति:

छत्रपती शिवाजी महाराज जन्मतारीख 19 (जन्मांक 1)

छत्रपती शिवाजी महाराज, जेम्स वॅट, एनी बेझंट, इंदिरा गांधी, शिवाजी गणेशन, धीरूभाई अंबानी, रतन टाटा, बिल गेटस, बिल क्लिंटन, प्रिन्सेस डायना, मारिया शारापोव्हा, मुकेश अंबानी, राहुल गांधी.

वैयक्तिक मार्गदर्शनासाठी संपर्क साधा: फोन: 8149703595 (महावीर सांगलीकर, Numerologist & Graphologist)

घरबसल्या न्यूमरॉलॉजी (अंकशास्त्र) शिका

अंकशास्त्र मराठी टेलिग्राम ग्रुप

हेही वाचा:

अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा!

नावाचं स्पेलिंग बदलताय? त्या आधी विचार करा!

अंकशास्त्रानुसार बाळाचे योग्य नाव

राशिभविष्य वाचू नका!

English Articles on Numerology

अंकशास्त्र: जन्मांक 2: जन्मतारीख 2, 11, 20, 29

अंकशास्त्र: जन्मांक 3: जन्मतारीख 3, 12, 21, 30

अंकशास्त्र: जन्मांक 4 जन्मतारीख 4, 13, 22, 31

अंकशास्त्र: जन्मांक 5 जन्मतारीख 5, 14, 23

अंकशास्त्र: जन्मांक 6 जन्मतारीख 6, 15, 24

अंकशास्त्र: जन्मांक 7 जन्मतारीख 7, 16, 25

अंकशास्त्र: जन्मांक 8 जन्मतारीख 8, 17, 26

1 thoughts on “अंकशास्त्र: जन्मांक 1: जन्मतारीख 1, 10, 19, 28

यावर आपले मत नोंदवा