अंकशास्त्र: स्मिता पाटील

महावीर सांगलीकर

स्मिता पाटील या हिंदी आणि मराठी सिनेजगतातल्या एक लोकप्रिय अभिनेत्री होत्या. आपल्या कारकिर्दीच्या त्या सुरवातीला मुंबई दूरदर्शनवरून मराठी बातम्या देण्याचे कामही करत असत. हिंदी आणि मराठीशिवाय त्यांनी गुजराती, कन्नड आणि मल्याळम सिनेमातही काम केले. त्यांनी आपल्या कसदार अभिनयासाठी दोन राष्ट्रीय फिल्म पुरस्कार आणि एक फिल्म फेअर पुरस्कार मिळवला होता, तेही केवळ दहा वर्षाच्या अवधीत, यावरून त्यांची अभिनय क्षमता दिसून येते.

स्मिता पाटील यांची जन्मतारीख 17 ऑक्टोबर 1955 ही होती. त्यानुसार त्यांचा जन्मांक (Birth Number) 8 तर भाग्यांक (Life Path Number) 2 येतो. (17=1+7=8, 17.10.1955=1+7+1+0+1+9+5+5 =29=2+9=11=1+1=2). इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे पूर्ण जन्मतारखेतील अंकांची बेरीज करत असताना त्यात 11 हा अंक येतो. 11 हा एक मास्टर नंबर आहे. चार्टमध्ये हा अंक असणारे लोक खूप यशस्वी व प्रसिद्ध झालेले दिसतात.

Smita Patil यांच्या Smita या नावाची अंकातली किंमतही 17 येते. (SMITA= 1+4+9+2+1=17). त्यांचे जन्मसाल असलेल्या 1955 मधील अंकाची बेरीज 20=2 म्हणजे त्यांच्या भाग्यांकाएवढी येते. म्हणजे त्यांच्या चार्टमध्ये 17(8) आणि 2 हे अंक रिपिट झाले आहेत. विशेष म्हणजे स्मिता पाटील यांच्या करिअरची सुरवात ज्या वर्षी झाली, ते वर्ष होते 1970. या वर्षातील अंकांची बेरीज देखील 17 येते!

स्मिता पाटील यांचा मृत्यू ज्या तारखेस झाला, ती तारीखही वैशिष्ठ्यपूर्ण होती. त्यांचा मृत्यू 13.12.1986 रोजी झाला. या तारखेतील अंकांची पूर्ण बेरीज 31 येते (13=4, 31=4), आणि त्यावेळी स्मिता पाटील यांनी आपल्या वयाची 31 वर्षे पूर्ण केली होती! अंकशास्त्रात 8 आणि 4 या अंकाचं एक विचित्र नातं आहे, ते चांगलं ही असू शकतं किंवा वाईटही. इथं 8 जन्मांक असलेल्या स्मिता पाटील यांचा मृत्यू अशा तारखेस झाला ज्या दिवशीच्या तारखेची बेरीज 4 होती आणि पूर्ण तारखेतील अंकांची बेरीजही 4 होती!

हेही वाचा:

अंक 3 आणि 5: अभिनय, कला आणि मनोरंजनाचे अंक

तुमच्या सहीमध्ये दडलंय तुमच्या यश आणि अपयशाचं रहस्य!

नावाचं स्पेलिंग बदलताय? त्या आधी विचार करा!

अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा!

Join my Numerology & Graphology Channel at Telegram:
https://t.me/mahaveersanglikar

Join my Business, Money & Wealth Channel at Telegram:
https://t.me/businessmoneywealth

यावर आपले मत नोंदवा