1 जून ज्यांचा वाढदिवस!

महावीर सांगलीकर

1 जून हा वाढदिवस असणाऱ्यांची संख्या वर्षातील इतर कोणत्याही तारखेस वाढदिवस असणाऱ्या लोकांपेक्षा जास्त असते. याचं कारण म्हणजे मुलांना शाळेत घालताना जर मुलाची जन्मतारीख माहीत नसली तर सरसकट 1 जून ही जन्मतारीख नोंदवण्याची पद्धत होती. सध्या हा प्रकार बंद झाला असला तरी या आधीच्या पिढीपर्यंत हा प्रकार मोठ्या प्रमाणात होता. त्यामुळे आधीच्या पिढीमध्ये 1 जूनला वाढदिवस असणाऱ्यांची संख्या मोठी दिसते. (पण त्यापैकी कांही लोकांची जन्मतारीख खरोखरच 1 जून असू शकते).

1 जून या तारखेला जन्मलेल्या व्यक्तीचा जन्मांक 1 असतो तर ऍटिट्यूड नंबर 7 असतो.

तुमची 1 जून ही जन्मतारीख खोटी असली तरी त्या तारखेला तुम्ही जर वाढदिवस साजरा करत असाल तर किंवा ती कागदोपत्री तुम्ही वापरत असाल तर तुमच्यात 1 आणि 7 या दोन्ही अंकांचे गुणदोष आढळून येतील.

1 या अंकाचे मुख्य गुण म्हणजे पुढाकार घेणे, नेतृत्व करणे, व्यवस्थापन आणि नियोजन, धाडस करणे वगैरे. मुख्य दोष म्हणजे बॉसिंग करणे, हुकुमशाही वृत्ती वगैरे.

7 या अंकाचे मुख्य गुण म्हणजे अंतर्मुख आणि अभ्यासू वृत्ती, ज्ञान मिळवण्याची लालसा, निरीक्षण आणि विश्लेषण कारण्याचीमोठी क्षमता, चिंतन-मनन करण्याची सवय आदी.

1st June

1 जून या तारखेला जन्मलेल्या व्यक्ती राजकीय व सामाजिक क्षेत्रात चांगल्या यशस्वी होऊ शकतात. तसेच व्यावसायिक क्षेत्रात, विशेषत: रिअल इस्टेट, शिक्षण क्षेत्र, मॅन्युफॅक्चरिंग यात त्यांना यश मिळू शकते. जबाबदारीच्या आणि वरच्या पदावरील नोकरी त्यांना चांगली ठरते. पोलीस खाते आणि सैन्य येथे देखील वरच्या पदावरील नोकरी त्यांच्या गुणांना वाव देणारी ठरते. याशिवाय त्यांच्यात शिक्षणतज्ज्ञ, संशोधक, शिक्षक, डिटेक्टिव्ह, स्पाय होण्याचीही क्षमता असते.

1 जूनला जन्मलेले कांही प्रसिद्ध लोक. यातील बहुतेकांची जन्मतारीख खरी नसून शाळेत नोंदलेली तारीख आहे: नर्गिस, राजू शेट्टी, इस्माईल दरबार, पदमसिंह पाटील, आनंदराव अडसूळ, लक्ष्मण माने, हरी नरके, सुरेश खोपडे.

हेही वाचा:

अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा!

शांती, सुसंवाद आणि सुबत्ता यांचा अंक 24

ज्योतिषांचं अंकशास्त्र!

अंकशास्त्र: कोणता जन्मांक चांगला?

नावाचं स्पेलिंग बदलताय? त्या आधी विचार करा!

English Articles on Numerology

यावर आपले मत नोंदवा