न्यूमरॉलॉजी आणि नंबर सायकॉलॉजी

महावीर सांगलीकर

Numerologist, Graphologist & Motivator
8149703595

कांही लोक एखाद्या विशिष्ट नंबरकडं आकर्षित होतात. त्यामागं तो नंबर म्हणजे त्या व्यक्तीची जन्मतारीख असण्याची शक्यता असते. हे एक न्यूमरॉलॉजीकल कारण झालं. पण असं एखाद्या नंबरकडं आकर्षित होण्यामागं दरवेळी न्यूमरॉलॉजीकल कारणच असेल असं नाही. कांहीवेळा त्यामागं मानसिक कारणंही प्रबळ असू शकतात. (अर्थात मानिसक कारणांच्यामागं त्या व्यक्तीच्या जन्मांकाचे किंवा भाग्यांकाचे गुणदोष असू शकतात).

चेन्नईतल्या एका तरुणाच्या मोटर सायकलचा नंबर 420 हा होता. अंकशास्त्राच्या एका अभ्यासकाला ही मोटर सायकल नजरेस पडली तेंव्हा त्यानं त्या तरुणाची सहज चौकशी केली. तोच नंबर का घेतला हे विचारलं. तर त्यानं सांगितलं, मला आवडला म्हणून घेतला! त्या अभ्यासकानं ओळखलं, हा तरुण बहुदा फ्रॉड असावा. पुढे त्याला समजलं की तो तरुण खरंच फ्रॉड होता!

खुनाच्या आरोपाखाली पकडला गेलेल्या हरियाणातल्या एका गुन्हेगाराच्या मोटरसायकलचा नंबर 302 होता!

अनेक लोक गाडीसाठी, घरासाठी 1 हा नंबर निवडतात. पण याचा अर्थ त्यांचा जन्मांक किंवा भाग्यांक 1 असतोच असे नाही, तर ज्यांना आपण टॉप नंबर वर जावे असे वाटते, त्यांच्यात 1 हा नंबर निवडण्याची प्रवृत्ती असू शकते. पण इथं हे लक्षात घेतलं पाहिजे की कांही विशिष्ट जन्मांकाच्या व्यक्तींमध्ये ही प्रवृत्ती जास्त प्रमाणात असते.

धार्मिक प्रवृत्तीचे लोक आपापल्या धर्मातील शुभ अंक आपल्या गाडीसाठी, मोबाईल फोन नंबरमधील शेवटच्या कांही अंकासाठी घेत असतात. उदा. 1008, 108, 786 वगैरे. पण असे नंबर्स प्रत्येकालाच लकी ठरतात असे नाही.

गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमध्ये इंडिअन पिनल कोडमधल्या फेमस नंबर्सचे आकर्षण असू शकते.

शहाण्याने सहज गम्मत म्हणूनही ‘बदनाम’ नंबर्स निवडू नयेत, (उदा. 302, 307, 420 वगैरे) नाहीतर त्यांना त्याचा मोठा फटका बसू शकतो. अर्थात असे ‘बदनाम’ नंबर्स देश आणि काल यांच्यानुसार वेगवेगळे असू शकतात.

हेही वाचा:

तुमचा परफेक्ट आणि बेस्ट लकी मोबाईल फोन नंबर कसा निवडावा?

नावाचं स्पेलिंग बदलताय? त्या आधी विचार करा!

लग्नानंतर नाव बदलताय? या गोष्टी लक्षात ठेवा!

तुमचा जन्मांक आणि तुमचे स्वभावदोष

अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा!

अंकशास्त्रानुसार बाळाचे योग्य नाव ठेवण्यासाठी……

बिझनेस न्यूमरॉलॉजी: तुमच्या व्यवसायाला बरकत आणा!

Testimonials and Feedback
Read What My Clients Say

Join my Numerology & Graphology Channel at Telegram:
https://t.me/mahaveersanglikar

यावर आपले मत नोंदवा