बाळासाहेब ठाकरे यांचे अंकशास्त्रीय विश्लेषण

महावीर सांगलीकर

Numerologist, Graphologist & Face Reader
Cell Phone/Telegram Number 8149703595

बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म 23 जानेवारी 1926 रोजी पुणे इथे झाला. जन्मतारखेतून आपल्याला 3 महत्वाचे अंक मिळतात. ते म्हणजे जन्मांक, भाग्यांक आणि ऍटिट्यूड नंबर. बाळासाहेबांच्या जन्मतारखेनुसार त्यांचा जन्मांक (Birth Number) 5 तर भाग्यांक (Life Path Number) 6 होता. त्यांचा ऍंटिट्यूड नंबरही 6 होता.

जन्मांक:
23= 2+3=5

भाग्यांक:
23.01.1926=(2+3) + (0+1) + (1+9+2+6) =5+1+18 =24=2+4=6

ऍंटिट्यूड नंबर
23.01= 2+3+0+1= 6

त्यांच्या जन्मतारखेतून निघणाऱ्या 3 अंकांमध्ये 6 हा अंक दोन वेळा आला आहे. (भाग्यांक व ऍंटिट्यूड नंबर ). याचा अर्थ त्यांच्यावर 6 या अंकाचा जास्त प्रभाव होता.

भाग्यांक व ऍंटिट्यूड नंबर 6 चे गुण
जबाबदार आणि कुटुंबवत्सल व्यक्तिमत्व, सौहार्द, सर्वसमावेशकता आदी. ज्यांना बाळासाहेबांचे व्यक्तिगत जीवन आणि स्वभाव माहीत आहे, ते जाणतातच की बाळासाहेब ठाकरे हे एक कुटुंबवत्सल व्यक्ती होते, आणि ते सर्वांना सांभाळून घेत. लहान असोत की मोठे असोत, कार्यकर्ते असोत की नेते असोत, सर्वांशी त्यांचे संबंध मैत्रीपूर्ण आणि सौहार्दपूर्ण असत. अगदी राजकीय विरोधाकांशी देखील त्यांचे वैयक्तिक संबंध चांगलेच असत. त्यांच्या भाषणात ते आपल्या राजकीय विरोधकांच्या जे कांही बोलत ते केवळ राजकारण म्हणून असे, प्रत्यक्षात त्यांच्या मनात किंवा वागण्यात इतरांच्याबद्दल अजिबात कटुता नसे.

आता आपण त्यांचा जन्मांक असलेल्या 5 या अंकाची वैशिष्ठ्ये पाहू.

जन्मांक 5 चे गुण:
प्रभावी वक्तृत्व, हजरजबाबीपणा, चित्रकलेची आवड, विविध कलांची आवड, झटपट विचार करण्याची आणि झटपट निर्णय घेण्याची क्षमता. हा अंक मेडिया आणि पत्रकारीतेशीही संबंधीत आहे. जन्मांक 5 असणारे लोक स्वतंत्र प्रवृत्तीचे असतात, त्यामुळे ते सहसा कुणाच्या हाताखाली काम करू शकत नाहीत. (Be your own boss ही उक्ति ते अमलात आणत असतात).

आपणास माहीत आहेच की बाळासाहेब ठाकरे यांचे वक्तृत्व अतिशय प्रभावशाली होते आणि कोणत्याही बाबतीत ते झटपट निर्णय घेत असत. त्यांना चित्रकलेची आवड होती आणि एक उत्कृष्ट व्यंग चित्रकार म्हणून ते प्रसिद्ध होते. त्यांनी आपल्या करीअरची सुरवात Free Press Journal या इंग्रजी दैनिकात व्यंगचित्रकार म्हणून केली. त्यांची व्यंगचित्रे टाईम्स ऑफ इंडियाच्या रविवारच्या आवृत्तीतही प्रकाशित होत असत. नंतर त्यांनी खास व्यंगचित्रांसाठी मार्मिक हे स्वत:चे मराठी साप्ताहिक सुरू केले.

बाळासाहेब आणि मुंबई
बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म पुण्यात झाला असला तरी त्यांची कर्मभूमि मुंबई होती. सर्वसाधारणपणे असे दिसून येते की एखाद्या शहराचा नामांक एखाद्या व्यक्तीच्या जन्मांक किंवा भाग्यांकाएवढा असेल, तर ते शहर त्या व्यक्तीसाठी अतिशय लाभदायक ठरते. बाळासाहेबांचा जन्मांक 23/5 होता MUMBAI या नावाची अंकातली किंमत 23/5 आहे. (4+3+4+2+1+9=23=2+3=5). तुम्हाला माहीत आहेच की मुंबई या शहर बाळासाहेबांना राजकीय आणि इतर दृष्टीने अतिशय लाभदायक ठरले, या शहरात त्यांचे कर्तृत्व बहरले संपूर्ण देशात ते प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचले.

हेही वाचा:

जन्मांक 5 जन्मतारीख 5, 14, 23

राशिभविष्य वाचू नका!

अंगविज्जा: देहबोली आणि अंगलक्षणावरील प्राचीन मराठी ग्रंथ

अंकशास्त्र: स्मिता पाटील

अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा!

अंकशास्त्रानुसार बाळाचे योग्य नाव ठेवण्यासाठी……

बिझनेस न्यूमरॉलॉजी: तुमच्या व्यवसायाला बरकत आणा!

Join my Numerology & Graphology Channel at Telegram:
https://t.me/mahaveersanglikar

यावर आपले मत नोंदवा