न्यूमरॉलॉजी । अजित दादा पवार आणि देवेंद्र फडणवीस

-महावीर सांगलीकर

Senior Numerologist & Graphologist
Cell Phone 8149703595


महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन दिग्गज नेते अजित दादा पवार आणि देवेंद्र फडणवीस हे एकमेकांच्या विरोधातील पक्षांमध्ये महत्वाच्या पदावर काम करत आहेत. अजित दादा पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे तर देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पक्षाचे. या दोन्ही पक्षात फारसे सख्य नसते. पण अजित दादा आणि देवेंद्र जी यांच्यातले सख्य उघडपणे दिसून येते. एकीकडे राष्ट्रवादीचे इतर नेते संधी मिळताच फडणवीसांवर टीका करता दिसतात, त्याचप्रमाणे भाजपाचे इतर नेते अजित दादांवर टीका करताना दिसतात. पण अजित दादा आणि फडणवीस हे दोघेही एकमेकांवर टीका करताना, एकमेकांना विरोध करताना सहसा दिसत नाहीत. या दोघांची मैत्री, या दोघांमध्ये असणारे सख्य लपून राहिलेले नाही. (आठवा: त्या दोघांचा पहाटेचा शपथविधी!).

काय कारण असेल बरे या मैत्रीमागे? तर यामागील एक महत्वाचे कारण न्यूमरॉलॉजिकल म्हणजे अंकशास्त्रीय आहे! या दोघांचीही जन्मतारीख 22 जुलै ही आहे. न्यूमरॉलॉजीनुसार समान जन्मतारखा असणाऱ्या व्यक्तींमध्ये मैत्रीभाव असतो, प्रेम असते. त्यामुळे अजित दादा आणि देवेन्द्रजी यांच्यात मैत्री असली तर नवल ते काय?

विशेष म्हणजे या दोघांच्या न्यूमरॉलॉजी चार्टमध्ये केवळ समान वाढदिवस हा एकच फॅक्टर नाही, तर त्यांचे इतर कोअर नंबर्सही कम्पॅटिबल आहेत. तसेच दोघांच्या चार्टमध्ये अनेक कॉमन नंबर्स आहेत.

(22/4 म्हणजे 22=2+2=4, 46/10/1 म्हणजे 46=4+6 =10=1+0=1, यानुसार इतर नंबर्सचाही अर्थ आहे. नामांक (एक्स्प्रेशन नंबर, हार्ट्स डिझायर नंबर आणि पर्सनॅलिटी नंबर) अनुक्रमे पूर्ण नावातील अक्षरे, स्वर आणि व्यंजने यावरून काढले जातात.)

अजित दादा पवार
बर्थ नंबर 22/4
ऍटिट्यूड नंबर 11/2
लाइफ पाथ नंबर 35/8
एक्स्प्रेशन नंबर 46/10/1
हार्ट’स डिझायर नंबर 14/5
पर्सनॅलिटी नंबर 32/5

देवेंद्र फडणवीस
बर्थ नंबर 22/4
ऍटिट्यूड नंबर 11/2
लाइफ पाथ नंबर 28/10/1
एक्स्प्रेशन नंबर 68/14/5
हार्ट’स डिझायर नंबर 22/4
पर्सनॅलिटी नंबर 46/10/1

वर दिलेल्या दोघांच्या कोअर चार्टमध्ये 22/4, 11/2, 46/10/1 आणि 14/5 हे अंक तुम्हाला समान दिसतील. दोन व्यक्तींच्या न्यूमरॉलॉजी चार्टमध्ये अनेक समान अंक असणे हे हायर कम्पॅटिबिलिटीचे लक्षण असते.

हेही वाचा:

बाळासाहेब ठाकरे यांचे अंकशास्त्रीय विश्लेषण

न्यूमरॉलॉजी | नंबर कम्पॅटिबिलिटी । अंकांची सुसंगतता व विसंगतता

नावाचं स्पेलिंग बदलताय? त्या आधी विचार करा!

न्यूमरॉलॉजी । मास्टर नंबर्स 11, 22, 33

अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा!

अंकशास्त्रानुसार बाळाचे योग्य नाव ठेवण्यासाठी……

बिझनेस न्यूमरॉलॉजी: तुमच्या व्यवसायाला बरकत आणा!

Join my Numerology & Graphology Channel at Telegram:
https://t.me/mahaveersanglikar

यावर आपले मत नोंदवा