अंकशास्त्र: अमिताभ बच्चन

महावीर सांगलीकर

Numerologist & Motivator
8149703595

अमिताभ बच्चन हे अभिनयाचे आणि बॉलीवूडचे बादशाह म्हणून ओळखले जातात. त्यांची जन्मतारीख 11.10.1942 ही आहे. त्यानुसार त्यांचा जन्मांक 2, ऍटिट्यूड नंबर 3 तर भाग्यांक 1 आहे.

जन्मतारीख 11
11 हा एक मास्टर नंबर आहे. ज्यांच्या न्यूमरॉलॉजी चार्टमध्ये 11 हा अंक असतो, त्यांच्याकडे आपल्या क्षेत्रात उत्तुंग स्थानावर पोहोचण्याची मोठी क्षमता असते.

जन्मांक 2
11=1+1=2
जन्मांक 2 असणाऱ्या व्यक्तिंची मुख्य वैशिष्ठ्ये म्हणजे त्या हसतमुख, मनमिळाऊ आणि मृदुभाषी असतात. त्या बहुधा भांडणतंटे, वादविवाद यापासून दूर रहातात. त्यांना टीका करायला सहसा आवडत नाही. अमिताभ बच्चन यांच्यात हे गुण दिसून येतात. स्वत:ला प्रेझेंट करण्यात अमिताभ बच्चन कुशल आहेत, हा 2 या अंकाचाच गुण आहे.

ऍटिट्यूड नंबर 3
3 हा अंक अभिनय,परफॉर्मिंग आर्ट्स, संगीत, गीत, वादन, कला, लिखाण अशा गोष्टींशी संबंधित आहे. ज्यांच्या न्यूमरॉलॉजी चार्टमध्ये 3 हा अंक असतो, त्या व्यक्तीला संबंधित एक अथवा अनेक गोष्टींची आवड असते व ती व्यक्ती त्या क्षेत्रात यशस्वी आणि प्रसिद्ध होऊ शकते. या संदर्भात तुम्ही पुढील लेख वाचावा: 3 आणि 5: अभिनय, कला आणि मनोरंजनाचे अंक

भाग्यांक 1
11.10.1942
1+1+1+0+1+9+4+2=19=1+9=10=1+0=1
भाग्यांक 1 असणाऱ्या व्यक्तींकडे आपल्या क्षेत्रात मोठे यश कमावण्याची आणि उत्तुंग स्थानावर पोहोचण्याची क्षमता असते. (इथे तुम्हाला असे दिसेल की अमिताभ बच्चन यांच्या 11.10.1942 या जन्मतारखेत 1 हा अंक चार वेळा आला आहे. एखादा अंक या प्रकारे अनेकदा आला, आणि तो अंक जर त्या व्यक्तीचा जन्मांक, ऍटिट्यूड नंबर किंवा भाग्यांक असेल तर तर त्या व्यक्तीमध्ये त्या अंकाचे गुणदोष जास्त प्रमाणात दिसून येतात).

जाता जाता मला आणखी एक उल्लेख करावासा वाटतो. हिंदी सिनेमाचे आधीचे बादशाह दिलीप कुमार यांची जन्मतारीखही 11 आहे, आणि त्यांचा भाग्यांकही 1 आहे! (11.12.1922). त्यांच्या पूर्ण जन्मतारखेतही बच्चन यांच्यासारखाच 1 हा अंकही चार वेळा आला आहे. हा योगायोग नसून अंकशास्त्रीय साम्य आहे आणि या साम्यामुळेच त्यांच्या कर्तृत्वात देखील बरेचसे साम्य आहे.

हेही वाचा:

बाळासाहेब ठाकरे यांचे अंकशास्त्रीय विश्लेषण

न्यूमरॉलॉजी । अजित दादा पवार आणि देवेंद्र फडणवीस

न्यूमरॉलॉजी | नंबर कम्पॅटिबिलिटी । अंकांची सुसंगतता व विसंगतता

न्यूमरॉलॉजी । मास्टर नंबर्स 11, 22, 33

अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा!

अंकशास्त्रानुसार बाळाचे योग्य नाव ठेवण्यासाठी……

Join my Numerology & Graphology Channels/Groups at Telegram:

अंकशास्त्र मराठी टेलिग्राम ग्रुप

Numerology, Graphology & Face Reading

यावर आपले मत नोंदवा