अंकशास्त्र: पंतप्रधान नरेंद्र मोदी

महावीर सांगलीकर

Numerologist, Graphologist
Cell Phone Number 8149703595

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म 17 सप्टेंबर 1950 रोजी झाला. त्यानुसार त्यांचा जन्मांक 17/8, ऍटिट्यूड नंबर 17/8 तर भाग्यांक 32/5 आहे. त्यांच्या Narendra Modi या नावानुसार त्यांचा नामांक देखील 17/8 आहे.

जन्मांक: 17=1+7=8
ऍटिट्यूड नंबर: 17.09 = 1+7+0+9=17=1+7=8
भाग्यांक: 17.09.1950 = (1+7) + (0+9) + (1+9+5+0) = (8) + (9) + (15) = 32 = 3+2=5

नामांक:
N A R E N D R A M O D I
5 1 9 5 5 4 9 1 4 6 4 9 = 39 + 23 = 12 + 5 =17 =1+7=8

त्यांच्या न्यूमरॉलॉजी चार्टमध्ये 17/8 हा अंक तीन वेळा आला आहे. (जन्मांक, ऍटिट्यूड नंबर आणि नामांक). याचा अर्थ त्यांच्यावर 17/8 या अंकाशी संबंधित गुणदोषांचा मोठा प्रभाव असायला पाहिजे. तसा तो आहे हे आपल्याला प्रत्यक्षातही दिसून येते.

17 हा अंक अध्यात्मिकतेशी संबंधित आहे. जे लोक राजकारणापलीकडच्या मोदींना जाणतात, त्यांना माहीत आहेच की नरेंद्र मोदी हे आध्यात्मिक प्रवृत्तीचे आहेत.

8 हा अंक व्यवस्थापन, सत्ता, अधिकार, धन, संपत्ती यांच्याशी संबंधित आहे. या अंकाची निगेटिव्ह बाजू म्हणजे डिक्टेटरशिप आणि नातेसंबंधातल्या समस्या. नरेंद्र मोदी यांच्या बाबतीत हे सर्वच गुणदोष प्रकर्षाने जाणवतात.

आता आपण नरेंद्र मोदी, त्यांच्या जीवनातील प्रमुख घटना आणि त्यांचा त्यांच्या जन्मांक 8 आणि भाग्यांक 5 या अंकांशी असलेला संबंध पाहू:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनात घडलेल्या महत्वाच्या घटनांचा 8आणि 5 या अंकांचा संबंध दिसतो.

वयाच्या 8 व्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध, वर्ष 1958 (बेरीज 23=5)

जन्म ठिकाण: VADNAGAR. या नावाची अंकातली किंमत 5.

NARENDRA MODI या नावाची अंकातली किंमत: 8

MODI या आडनावाची अंकातली किंमत: 5

पत्नीचं नाव: JASODABEN, अंकातली किंमत: 8

त्यांच्या वडिलांचं नाव DAMODARDAS अंकातली किंमत: 8

वयाच्या 17 व्या वर्षी घर सोडले. (17 जन्मतारीख, 17=8). ते साल होते 1967. या सालातील अंकांची बेरीज 23=2+3 =5

1970 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्ण वेळ प्रचारक बनले. 1970 मधील अंकांची बेरीज 17=1+7=8
1988: भा.ज.प. च्या गुजरात युनिटच्या संघटन सचिवपदी निवड. 1988 मधील अंकांची बेरीज 26=2+6=8

पंतप्रधानपद: 26.5.2014: 26=8

विशेष म्हणजे नरेंद्र मोदी हे भारताचे 14 वे पंतप्रधान आहेत. 14=1+4=5

त्यांचं सध्याचं कामकाजाचं आणि निवासाचं ठिकाण: NEW DELHI: या नावाची अंकातली किंमत 8.

नरेंद्र मोदी यांनी दिनांक 8 नोव्हेंबर रोजी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांवर बंदी घालण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. हे त्यांनी रात्री 8 वाजता जाहीर केलं! पुन्हा 8!

पंतप्रधानपदाची दुसऱ्यांदा शपथ: तारीख 30.05.2019. या दिवसाचा ऍटिट्यूड नंबर: 30.05= 3+0+0+5 =8

5 ऑगस्ट 2019 रोजी राज्यसभेने तर 6 ऑगस्ट 2019 रोजी लोकसभेने संसदेने एक प्रस्ताव पारित करून भारतीय संविधानातील 370 कलम हटवले. ते प्रत्यक्षात 31.10.2019 रोजी लागू झाले. या तिन्ही तारखांमध्ये नरेंद्र मोदी यांचा जन्मांक 17/8 अथवा भाग्यांक 5 हे अंक आलेले दिसतात!
05.08.2019 (मोदींचा भाग्यांक 5)
06.08.2019 या तारखेतील अंकांची बेरीज 26=8, (मोदींचा जन्मांक 8)
31.10.2019 या तारखेतील अंकांची बेरीज 17=8! या दिवसाचा ऍटिट्यूड नंबर 31.10= 3+1+1+0= 5! विशेष म्हणजे या तारखेत मोदी यांचे 17/8 आणि 5 हे दोन्ही अंक आहेत!

हेही वाचा:

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

बाळासाहेब ठाकरे यांचे अंकशास्त्रीय विश्लेषण

न्यूमरॉलॉजी । अजित दादा पवार आणि देवेंद्र फडणवीस

अंगविज्जा: देहबोली आणि अंगलक्षणावरील प्राचीन मराठी ग्रंथ

अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा!

अंकशास्त्रानुसार बाळाचे योग्य नाव ठेवण्यासाठी……

अंकशास्त्र मराठी टेलिग्राम ग्रुप

यावर आपले मत नोंदवा